Ahilyanagar Municipal Corporation : ‘हे काय चाललंय?’ धुळखात पडलेले महापालिकेचे रेकॉर्ड पाहून उपमहापौर आक्रमक; आयुक्तांना थेट Video Call

Dhananjay Jadhav inspects Ahilyanagar civic office after complaints over delayed certificates and neglected old records : जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी नागरिकांच्या तक्रारी; जुन्या महापालिका कार्यालयातील रेकॉर्ड रूमची अचानक पाहणी
Dhananjay Jadhav
Dhananjay JadhavSarkarnama
Published on: 
Updated on: 

Ahilyanagar Municipal Corporation news : अहिल्यानगर महापालिकेतील नागरिकांच्या विविध तक्रारी आणि प्रशासनाच्या कामकाजातील कथित दिरंगाईवरून सत्ताधारी भाजपचे उपमहापौर धनंजय जाधव आक्रमक झाले आहेत.

जन्म-मृत्यू दाखले आणि इतर कागदपत्रांसाठी नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याच्या तक्रारी मिळाल्यानंतर जाधव यांनी जुन्या महापालिका कार्यालयाला अचानक भेट दिली. या पाहणीदरम्यान कार्यालयातील रेकॉर्ड रूममध्ये महत्त्वाचे जुने दप्तर अस्ताव्यस्त आणि धुळखात पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

भाजपचे (BJP) उपमहापौर धनंजय जाधव यांनी कार्यालयात प्रवेश केल्यानंतर विविध विभागांची तसेच रेकॉर्ड रूमची पाहणी केली. यावेळी नागरिकांनी विविध दाखल्यांसाठी केलेले अर्ज तसेच महत्त्वाचे आणि ऐतिहासिक रेकॉर्ड असलेले जुने दस्तऐवज अस्ताव्यस्त अवस्थेत असल्याचे दिसून आले. काही कागदपत्रांवर धूळ साचल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले

या परिस्थितीबाबत उपमहापौर जाधव यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांकडे (Worker) विचारणा केली. महत्त्वाची शासकीय कागदपत्रे आणि जुने रेकॉर्ड अशा पद्धतीने ठेवण्यात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. कार्यालयातील जागा दप्तरामुळे व्यापली असून, कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठीही अडचणी निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

Dhananjay Jadhav
Ahilyanagar DCC Bank Election : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला विश्वासात घेतले नाही? बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितले

आयुक्तांना थेट Video Call

पाहणीदरम्यान उपमहापौर धनंजय जाधव यांनी महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांना थेट व्हिडिओ कॉल केला. कार्यालयातील धुळखात पडलेले जुने दप्तर आणि अस्ताव्यस्त रेकॉर्ड त्यांनी आयुक्तांना व्हिडिओ कॉलद्वारे दाखवले. या रेकॉर्डची तातडीने छाननी करून योग्य पद्धतीने व्यवस्था करण्याची सूचना त्यांनी केली.

Dhananjay Jadhav
Shiv Sena Vs BJP : सभागृहातून थेट पोलिस ठाण्यात! उल्हासनगरमध्ये शिवसेना-भाजपचा वाद विकोपाला, महापौरांच्या पतीसह 40 जणांविरोधात गुन्हा

आयुक्तांकडून दखल

तसेच, धुळखात पडलेले दप्तर हटवून संबंधित जागा कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही जाधव यांनी केली. यावेळी आयुक्त यशवंत डांगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी नागरिकांचे हेलपाटे

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जुन्या महापालिका कार्यालयात जन्म-मृत्यू दाखले तसेच इतर विविध दाखले मिळण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी उपमहापौर धनंजय जाधव यांच्याकडे नागरिकांनी केल्या होत्या. कर्मचारी वेळेत काम करत नसल्याने नागरिकांना वारंवार महापालिका कार्यालयात ये-जा करावी लागत असल्याची तक्रारही करण्यात आली होती.

रेकाॅर्डची संभाळावे

या तक्रारींची दखल घेत जाधव यांनी अचानक कार्यालयाची पाहणी केली. या पाहणीत प्रशासनाच्या कामकाजातील त्रुटी निदर्शनास आल्याचा दावा त्यांनी केला असून, संबंधित विभागांनी नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करावीत आणि रेकॉर्डची योग्य पद्धतीने जपणूक करावी, अशा सूचना दिल्या आहेत. दरम्यान, महापालिका प्रशासनाकडून या प्रकरणी पुढील कार्यवाही काय केली जाते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com