ACB Raid: 10 हजारांच्या लाचेनं उघड झाली कोट्यवधीची संपत्ती! जिल्हाधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड; रात्रभर पैशांची मोजदाद

ACB Raid on Akola Stamp Collector Kiran Chaudhari’s Jalgaon Home:अकोल्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्या जळगाव येथील घरावर एसीबीची मोठी कारवाई. रोख रक्कम, सोने-चांदी आणि मालमत्तेची कागदपत्रे मिळून जवळपास 3 कोटींचा मुद्देमाल जप्त.
ACB Raid on Akola Stamp Collector Kiran Chaudhari’s Jalgaon Home
ACB Raid on Akola Stamp Collector Kiran Chaudhari’s Jalgaon HomeSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon ACB Action: अकोल्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्या जळगाव येथील घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) टाकलेल्या धाडीत तब्बल जवळपास 3 कोटींचे घबाड सापडल्याने खळबळ उडाली आहे. जळगावातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी एसीबी कारवाई मानली जात आहे. 10 हजार रुपयांची लाच घेताना अटक झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने चौधरी यांच्या घराची झाडाझडती घेतली असता बेहिशेबी संपत्तीचा मोठा साठा समोर आला.

नाशिक आणि जळगाव एसीबीच्या 8 ते 10 अधिकाऱ्यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री ‘इन-कॅमेरा’ कारवाई करत घराची तपासणी केली. या कारवाईत तब्बल 1 कोटी 53 लाखांहून अधिक रोख रक्कम, 72 लाखांच्या आसपास सोन्या-चांदीचे दागिने, तसेच विविध ठिकाणच्या मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड आढळल्याने ती मोजताना यंत्रणेचीही दमछाक झाली.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात 422 ग्रॅमपेक्षा अधिक सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, लाखो रुपयांच्या सोने खरेदीच्या पावत्या, महागड्या घरगुती वस्तू आणि आरोपी तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावरील मालमत्तेची कागदपत्रे यांचा समावेश आहे. या सर्वांची एकूण किंमत 2 कोटी 94 लाख 64 हजार 847 रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले.

ACB Raid on Akola Stamp Collector Kiran Chaudhari’s Jalgaon Home
Shirur Bazar Samiti Election: सत्ताधाऱ्यांना कोर्टाचा दणका! शिरूर बाजार समिती निवडणूक रद्द

किरण चौधरी यांच्याविरोधात अकोला येथील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणामुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

ACB Raid on Akola Stamp Collector Kiran Chaudhari’s Jalgaon Home
PF Interest Rate: PF कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! EPF व्याजदराबाबत सरकारचा महत्वाचा निर्णय; रक्कम कधी जमा होणार?

• अकोला मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्या घरावर एसीबीची मोठी धाड

• 10 हजारांची लाच घेताना अटक; त्यानंतर घराची झाडाझडती

• कारवाईत तब्बल 2.94 कोटींचा मुद्देमाल जप्त

• दीड कोटींहून अधिक रोख रक्कम एसीबीच्या हाती

• 72 लाखांचे सोने-चांदीचे दागिने जप्त

• मालमत्तेची कागदपत्रे आणि सोने खरेदीच्या पावत्याही सापडल्या

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com