Video BJP Politics : महाराष्ट्र विधानसभा जिंकण्यासाठी भाजपला गुजरातची मदत, अमित शाह यांचा 'खास प्लॅन'

BJP amit shah assembly election : भाजपने परराज्यातील असलेल्या नेत्यांवर खास जबाबदारी देण्यात आली आहे. या नेत्यांनी पक्ष कार्यकर्त्यांशी चर्चा करायची आहे. पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांना सक्रिय करायचे आहे.
amit shah
amit shahsarkarnama
Published on
Updated on

BJP Politics : महाराष्ट्र जिंकण्यासाठी भाजप 'अ‍ॅक्शन मोड'वर आहे. लोकसभेत झालेल्या पिछेहाटमुळे गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रासाठी खास प्लॅन तयार केला आहे. या प्लॅननुसार गुजरातमधील नेते महाराष्ट्रामध्ये ठाण मांडून मतदारसंघांचा आढावा घेत आहेत.

गुजरातमधील आजी, माजी आमदारांनी नाशिकमध्ये आढावा बैठक घेतली. हे नेते अमित शाह यांच्या मर्जीतील समजले जातात. महाराष्ट्र जिंकण्यासाठी गुजरात भाजपच्या नेत्यांची खास टीम तयार करण्यात आली आहे.

हे नेते मतदारसंघानिहाय आढावा घेत आहेत. 48 मतदारसंघांची जबाबदारी त्यांच्यावर आहे. या गुजरातच्या नेत्यांप्रमाणे विभागानुसार वेगवेगळ्या राज्यातील नेते बैठका घेत आढावा घेत आहेत. मराठवाड्यातील मतदारसंघाची जबाबादीर छत्तीसगडमधील नेत्यांवर आहे.

amit shah
Nana Patole : मराठा आरक्षणावर नाना पटोले काढणार तोडगा, कसा आणि कधी?

नेत्यांवर खास जबाबदारी

परराज्यातील असलेल्या नेत्यांवर खास जबाबदारी देण्यात आली आहे. या नेत्यांनी पक्ष कार्यकर्त्यांशी चर्चा करायची आहे. पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांना सक्रिय करायचे आहे. तसेच बुथ पासून सर्व वरच्या कमिटींचा आढावा घ्यायचा आहे. आणि आपला अहवाल द्यायचा आहे.

कार्यकर्त्यांकडे जा...

परराज्यातील नेत्यांना वरिष्ठांकडून खास सूचना देण्यात आल्या आहेत. या नेत्यांनी जेवण हाॅटेलमध्ये करायचे नाही. त्यांनी कार्यकर्त्यांची घरीच जेवण करायचे आहे. सामान्य माणसांशी, कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घ्यायच्या आहेत.

नरेटिव्ह खोडून काढणार

लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी नेरेटिव्ह सेट केला. त्याचा मोठा फटका भाजपला बसला होता. त्यामुळे नरेटिव्ह खोडून काढण्याचा जबाबदारी देखील या प्रवासी नेत्यांवर असणार आहे. पक्षातील अंतर्गत वाद, उमेदवाराबाबत लोकांचे मत याचे रिपोटींग हे नेते वरिष्ठांना करणार आहेत.

amit shah
Manoj Jarange Patil News : मनोज जरांगेंचा कृषीमंत्र्यांना एक फोन अन् शेतकऱ्यांना सरसकट मदतीचा दिला शब्द

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com