Sanjay Raut : अण्णा हजारेंनी 'कॉक्रोच जनता पक्षा'वर भाष्य करताच राऊतांची थेट ऑफर; म्हणाले, "आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत..."

Anna Hazare on Cockroach Janata Party: कॉक्रोच जनता पार्टी चळवळीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी स्वागत केले होते. या संदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी टीकात्मक विधान केले होते. हाच धागा पकडून राऊत यांनी आज नाशिकमध्ये अण्णा हजारे यांच्या विधानाची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला.
Sanjay Raut, Anna Hazare
Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut reacts to Anna Hazare's remarks on Prime Minister Narendra Modi during a political interaction in NashikSarkarama
Published on
Updated on

Nashik News, 03 Jun : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यांचे हे विधान सध्या राजकीय दृष्ट्या चर्चेचा विषय बनलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कॉक्रोच जनता पार्टी चळवळीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी स्वागत केले होते. या संदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी टीकात्मक विधान केले होते. हाच धागा पकडून ठाकरेंतच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज नाशिकमध्ये अण्णा हजारे यांच्या विधानाची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला.

संजय राऊत म्हणाले, "अण्णा हजारे प्रदीर्घ काळानंतर व्यक्त झाले आहे. त्यांनी मौन सोडले आणि कंठ फुटला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी केलेले त्यांचे विधान नक्कीच चर्चेचा विषय होऊ शकते. आम्ही अण्णा हजारे यांच्या भूमिकेचे स्वागत करतो. आता अण्णा हजारे यांनी त्यावर ठाम राहावे.

Sanjay Raut, Anna Hazare
Ladki Bahin Beneficiaries : अपात्र ‘लाडकी’वर हजारो कोटी लुटले; शिंदे-फडणवीस-पवारांनी मते विकत घेतली, गुन्हा नोंदवा, ठाकरेंच्या शिलेदाराच्या मागणी खळबळ

पुन्हा नवी दिल्लीकडे कुच करावी. रामलीला मैदानावर आंदोलन करावे आम्ही सर्व त्यांच्या सोबत येऊ." मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची सवलत जाहीर केली आहे. त्यावरही राऊत यांनी भाष्य केलं.

Sanjay Raut, Anna Hazare
Kokan Politics : एकनाथ शिंदेंनी लक्ष घालताच शिवसेना आमदाराची तलवार म्यान; सुनील तटकरेंच्या चिरंजीवाचा विधानपरिषदेचा मार्ग मोकळा

"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रत्येक घोषणा ही एक फसवणूक असते. त्यामुळे खरे काय हे लवकरच पुढे येईल. शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करणे हीच आमची सगळ्यांची प्रमुख मागणी आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती", असं म्हणत राऊतांनी मुख्यमंत्र्यावर टीका करत उद्धव ठाकरेंत्या काळातील कर्जमाफीची आठवण करून दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com