Anna Hazare On Cockroach Janta Party : “कॉकरोच जनता पार्टी”ला अण्णा हजारेंचा अप्रत्यक्ष पाठिंबा? युवकांच्या असंतोषावर मोठं विधान, नव्या आंदोलनाचे संकेत

Anna Hazare remarks on the viral ‘Cockroach Janta Party’ movement have reignited debate over youth anger, unemployment, corruption, and anti-establishment politics India : बेरोजगारी, पेपरफुटी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर सोशल मीडियातून पेटलेलं ‘कॉकरोच जनता पार्टी’ आंदोलन आता राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी; अण्णा हजारेंच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाची शक्यता आहे.
Anna Hazare On Cockroach Janta Party
Anna Hazare On Cockroach Janta PartySarkarnama
Published on
Updated on

Cockroach Janta Party viral trend : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 2011 मध्ये उभारलेल्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाने देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली होती.

‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ आंदोलनातून अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचा उदय झाला, तर काँग्रेसविरोधात निर्माण झालेल्या वातावरणाचा फायदा भाजपला 2014 च्या लोकसभा निवडणुकीत झाला.

आता तब्बल काही वर्षांनंतर पुन्हा एकदा युवकांमध्ये असंतोषाची लाट उसळताना दिसत आहे. बेरोजगारी, पेपरफुटी, महागाई आणि भ्रष्टाचाराच्या (Corruption) मुद्द्यांवर सोशल मीडियातून सुरू झालेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ या व्यंगात्मक ऑनलाइन आंदोलनाची देशभर चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, या आंदोलनाला आता अण्णा हजारेंनीही अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

“झुरळ” शब्दाचा उद्देश काय होता? असा प्रश्न करत कॉकरोच जनता पार्टीबाबत प्रतिक्रिया देताना अण्णा हजारे (Anna Hazare) म्हणाले, “न्यायाधीशांनी युवकांना झुरळ कोणत्या उद्देशाने म्हटलं, याचा विचार करावा लागेल. मात्र, या झुरळ जनता पार्टीच्या मागे युवक उभे राहत आहेत, हे अधिक महत्त्वाचं आहे.”

Anna Hazare On Cockroach Janta Party
IB report Modi government : IBच्या अहवालामुळे खळबळ? ‘कॉक्रोच जनता पार्टी’ अकाऊंट हॅकप्रकरणी नाना पटोलेंचा गंभीर आरोप

ते पुढे म्हणाले की, “‘झुरळ’ हे नाव योग्य वाटत नसले, तरी जनता या आंदोलनामागे उभी राहताना दिसत आहे. युवा शक्ती ही राष्ट्रशक्ती असते. त्यामुळे युवकांना दुर्लक्षित करून चालणार नाही.” अण्णा हजारेंच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर सुरू असलेल्या आंदोलनाला आणखी बळ मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे. लोकायुक्त अंमलबजावणीसाठी आंदोलनाचे संकेत यावेळी अण्णा हजारेंनी केंद्रातील लोकपाल आणि राज्यातील लोकायुक्त कायद्याच्या अंमलबजावणीचाही मुद्दा उपस्थित केला.

Anna Hazare On Cockroach Janta Party
Cockroach Janata Party Goes Viral : ‘कॉक्रोच जनता पार्टी’वर गार्डियन ते रॉयटर्सची नजर; व्यंग की बंड? देशातील युवकांचा संताप जगभर चर्चेत

ते म्हणाले, “केंद्रात लोकपाल आणि राज्यात लोकायुक्त कायदा आहे. लोकायुक्त कायदा मंजूर झाला, पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही. आता त्यासाठी पुन्हा आंदोलन करावं लागतं की काय, अशी परिस्थिती आहे.” अण्णा हजारेंच्या या विधानामुळे महाराष्ट्रात पुन्हा भ्रष्टाचारविरोधी आंदोलन उभं राहणार का, याची चर्चा सुरू झाली आहे.

‘कॉकरोच जनता पार्टी’

या संपूर्ण वादाची सुरुवात 15 मे रोजी झाली. सर्वोच्च न्यायालयातील एका सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश Surya Kant यांनी बेरोजगारी आणि व्यवस्थेविरोधातील असंतोषावर भाष्य करताना, “काही तरुणांना रोजगार किंवा करिअरमध्ये जागा मिळत नाही, त्यामुळे ते कॉक्रोचसारखे सर्वत्र पसरतात,” असं विधान केल्याचं समोर आलं.

व्यंगात्मक ऑनलाइन मोहिम

यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आणि ‘कॉक्रोच’ हा शब्दच आंदोलनाचं प्रतीक बनला. याच पार्श्वभूमीवर अभिजीत दिपके यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’ नावाने व्यंगात्मक ऑनलाइन मोहिम सुरू केली.

मोहिमेचा सोशलवर जोर

सध्या हे आंदोलन सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, बेरोजगार तरुण, स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आणि सरकारविरोधी नाराजी व्यक्त करणारे अनेक जण या मोहिमेशी जोडले जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com