Ashok Kharat : अबब.. काही वर्षातच 74 पटीने वाढलं खरातच्या शिवनिका संस्थानच उत्पन्न...आकडा पाहून विस्फारतील डोळे!

Ashok Kharat Shivnika Sansthan income : अशोक खरातच्या संस्थानचे अचानक इतक्या झपाट्याने वाढलेल्या या उत्पन्नाचा शोध आता पोलिस घेत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
Ashok Kharat
Ashok KharatSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : नाशिक जिल्ह्यातील भोंदू अशोक खरात याची सध्या राज्यभरात चर्चा आहे. भोंदूगिरी व कथित शक्तीचा वापर करत त्याने अनेक महिलांवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. याशिवाय त्याने वेगवेगळे फंडे वापरत हायप्रोफाईल भाविकांची लूट करत कोट्यावधींची माया जमवली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे अशोक खरात याच्या सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री शिवनिका संस्थान'च्या उत्पन्नात गेल्या काही वर्षांमध्ये तब्बल 74 पटींनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. त्याच्या संस्थानने धर्मादाय आयुक्तालयाकडे सादर केलेल्या लेखापरीक्षणातूनच ही बाब उघड झाली आहे. त्यामुळे अचानक इतक्या झपाट्याने खरातचे उत्पन्न कसे वाढले याबाबत संशय व्यक्त होत आहे. या संस्थानची मालमत्ता ज्या वेगाने वाढली आहे, ते पाहाता तपास यंत्रणांचे डोळे विस्फारले आहेत.

अनेक महिलांवर केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे कॅप्टन खरात मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्याचे शंभरहुन अधिक व्हिडीओ असल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत त्यातील सहा पीडित महिलांनी पुढे येत त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्याच्याविरोधात तक्रार करणाऱ्या महिलांची संख्या वाढू लागली असतानाच आता त्यात त्याच्या मिरगाव येथील श्री शिवनिका संस्थानातील आर्थिक गैरव्यवहारांची भर पडल्याने त्याचा पाय आणखी खोलात जाणार आहे.

Ashok Kharat
Ashok Kharat : लैंगिक क्षमता वाढविणारे खरातचे 'तुर्की मध' ; एक किलोची बाटली तब्बल 9 लाखांना विकायचा, कसं काढायचा वेड्यात?

मिरगाव येथील श्री शिवनिका संस्थानने धर्मादाय आयुक्तालयाला सादर केलेल्या लेखापरीक्षणानुसार, या संस्थानाची मालमत्ता अवघ्या काही वर्षांत कोटींच्या घरात पोहचल्याचे उघड झाले आहे. गेल्या सात ते आठ वर्षांपूर्वी संस्थानची आर्थिक स्थिती तुटीची होती. संस्थानचे 2018-19 पर्यंत खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी आर्थिक स्थिती होती. मात्र त्यानंतर त्याचे उत्पन्न खूप झपाट्याने वाढले. (Nashik News)

संस्थानचे 2018-19 चे उत्पन्न पाहाता सुमारे एक लाख ६० हजार ते एक लाख ६५ हजारांची तूट होती. मात्र 2019-20 मध्ये अचानक संस्थानच्या मालमत्तेमध्ये भरमसाट वाढ झाली. सात लाखांवरून थेट एक कोटी 41 लाखांवर उत्पन्न गेले. 2014 मध्ये तर संस्थानवर देणग्यांचा वर्षाव झाला. एकाच वर्षात तब्बल 76 लाख 91 हजार 416 रुपयांच्या देणग्या आल्या. तब्बल 74 पटींनी ही वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या या उत्पन्नाचा शोध आता पोलिस घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Ashok Kharat
Rupali Chakankar : चहुबाजूंनी संकटात सापडलेल्या चाकणकरांच्या मदतीला गणेश मंडळ आलं धावून; बोट कापल्याच्या दाव्याचं खंडण करत 'तो' घटनाक्रमच सांगितला

अनेक हायप्रोफाईल लोक त्यांच्या विविध समस्या व अडचणी सोडवण्यासाठी खरातकडे येत. या हायप्रोफाईल भाविकांना तो चांगलच लूटन घेत असे. बाजारात शंभर रुपये किलोने मिळणारे खडे, चिंचोके मंतरलेले असल्याचे भासवून तो लाखो रुपयांना विकायचा. एक चिंचोका किंवा खडा तो एक लाखाला विकायचा. एल्विश हनी नावाने तो मधाची विक्री करायचा. हे मध तुर्कीतील समुद्राच्या खोल गुहांमधून आणल्याचे सांगत तो एक किलो मधाची बाटली तब्ब ९ लाखांना विकायचा. मिरगावातील त्याच्या श्री ईशान्येश्वर मंदिरात तो पूजाविधीही करायचा. त्या माध्यमातूनही तो लाखो रुपये उकळत होता. हेच पैसे तो संस्थानच्या बँक खात्यावर घेत असल्याचेही समोर येत आहे.

वर्षनिहाय वाढत गेलेले आर्थिक उत्पन्न

  • २०१७ - १८ ....४,६७,६०१ रुपये

  • २०१८ - १९ ....७,२७,८२३ रुपये

  • २०१९ - २० ....१,४१,७९,९२८ रुपये

  • २०२० - २१ ....१,५५,५०,९६२ रुपये

  • २०२१ - २२ ....१,४१,०४,०४७ रुपये

  • २०२२ - २३ ....१,४०,९५,७२३ रुपये

  • २०२३ - २४ ....२,५७,०४१ रुपये

  • २०२४ - २५ ....२,१५,११,१६९ रुपये

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com