BJP Politics : गायत्री भंगाळेंचा जातीचा दाखला अवैध ठरताच भाजपने फासे टाकले, भुसावळ पालिकेची सूत्र हाती घेण्याची रणनिती

Bhusawal municipal Politcs : भुसावळ नगरपालिकेच्या नगराध्यक्षा गायत्री चेतन भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र जातपडताळणी समितीने अवैध ठरविले आहे. त्यामुळे त्यांचे पद आता धोक्यात आले आहे.
Gayatri Bhangale Bhusawal
Gayatri Bhangale Bhusawal Sarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Politics : भुसावळ नगपालिकेचे वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगराध्यक्षा गायत्री चेतन भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र जिल्हास्तरीय जातपडताळणी समितीने अवैध ठरविले आहे. त्या नगराध्यक्षपदासाठी अपात्र ठरल्या आहेत. भाजपकडून या संधीचं सोनं करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहे.

पुढची प्रक्रिया होईपर्यंत भुसावळ नगरपालिकेत अधिक संख्याबळ असलेल्या भाजपच्या उपनगराध्यक्षांकडे प्रभारी पदभार द्यावा अशी मागणी भाजपने लावून धरली आहे. या मागणीसाठी भाजपच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट देखील घेतली आहे.

भुसावळ नगरपालिकेत लोकनियुक्त नगराध्यक्षपद हे अनुसूचित जाती (महिला) साठी राखीव होते. नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार व वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचा गायत्री भंगाळे यांनी तब्बल एक हजार ८४७ मतांनी पराभव केला होता. मंत्री सावकारे यांच्या पत्नीचा पराभव झाल्याने जिल्हाभरात या निकालाची मोठी चर्चा झाली होती. गायत्री भंगाळे यांनी नगराध्यक्षा म्हणून कामकाज पाहायला सुरुवात केली होती. मात्र, त्यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र अवैध ठरवल्याने त्यांचे पदच धोक्यात आले आहे.

Gayatri Bhangale Bhusawal
Jalgaon Politics : भाजप मंत्र्यांच्या पत्नीचा पराभव करून नगराध्यक्ष झाल्या ; आता जातीचा दाखला ठरला अवैध, पद धोक्यात

मात्र, भंगाळे यांनी सादर केलेला जातीचा दाखला बनावट असून, त्यांच्या नातेवाइकांचा मूळ रहिवास उत्तर प्रदेशातील महुबा जिल्ह्यातील असल्याची तक्रार स्वत: रजनी सावकारे यांनी केली होती. सावकारे यांच्यासह संजय तायडे, राहुल तायडे, प्रमोद सावकारे यांनी जळगाव येथील जातपडताळणी समितीकडे ही तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत समितीने पुराव्यांची तपासणी करुन भंगाळे यांचा दाखला अवैध असल्याचा निकाल दिला आहे.

Gayatri Bhangale Bhusawal
Pune rickshaw license rule : महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी निर्णय कोणत्याही दबावाखाली बदलू नये; शिवतारेंचे फडणवीस, शिंदे यांना पत्र

बाबत समितीने अहवाल शासनाकडे पाठविला आहे. आता त्या जागेबाबत शाासन लवकरच निर्णय घेईल. परंतु आता त्याजागेवर नवीन नगराध्यक्षांची निवड होईपर्यंत भाजपच्या उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे यांच्याकडे प्रभारी नगराध्यक्षपदाचा पदभार द्यावा अशी मागणी भुसावळ पालिकेतील भाजपचे गटनेते युवराज लोणारी, नगरसेवक पिंटू कोठारी, नगरसेवक बोधराज चौधरी व नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांच्याकडे केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com