Sanjay Raut : भाजपचे लोक पळून गेले..! पुराव्याची गरज काय ? राऊतांनी घेतला फडणवीसांचा समाचार...

Sri Ram Temple of Ayodhya : अयोध्येच्या श्रीराम मंदिर उभारणीत शिवसेनेच्या योगदानावरुन टीका
Sanjay Raut, Devendra Fadnavis
Sanjay Raut, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut : अयोध्येच्या श्रीराम मंदिर उभारणीत शिवसेनेचे योगदान काय ? असा प्रश्न करणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरे शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा समारंभाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले आहे.

Sanjay Raut, Devendra Fadnavis
Shankaracharya News : शंकराचार्यांची भूमिका ही शुक्राचार्यांसारखी; हिंदू राष्ट्र सेनेची कठोर शब्दात टीका!

त्यात मंदिर उभारणीत शिवसेनेचे योगदान काय ? असा प्रश्न करून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्याला आज खासदार संजय राऊत यांनी जोरदार उत्तर दिले आहे. ते म्हणाले, बरे झाले फडणवीस यांनीच शिवसेनेचे योगदान काय ? असा सवाल केला आहे. हे त्यांच्या कोणत्या आणि संकुचित राजकीय संस्कृतीचे लक्षण आहे. आमचे योगदान काय ? हे आम्ही दाखवून देवू.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उद्याच्या अधिवेशनात आम्ही कारसेवकांना देखील बोलावले आहे. त्यावेळी राम मंदिराच्या उभारणीत आमचे योगदान काय ? हे आम्ही दाखवून देऊ. खासदार राऊत पुढे म्हणाले की, भाजपने कारसेवे विषयी काही छायाचित्रे टाकली आहेत. तशीच छायाचित्रे आमच्याकडे देखील आहेत. पण तेव्हा तुमचे लोक पळून गेले होते, याला पुरावा देण्याची गरज नाही.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः अयोध्येतील वादग्रस्त वास्तू पाडल्याची जबाबदारी घेतली होती. हे जगजाहीर आहे. हा पुरावा पुरेसा नाही का ? हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे, असे आव्हान राऊत यांनी दिले. तुमच्या नागपूर रेल्वे स्टेशनचा फोटो आमच्याकडे आहे. नागपूरमध्ये फक्त रेल्वे स्टेशनच फिरण्यासारखे आहे. त्या वादात मी जाणार नाही, परंतु आमचा फोटो घुमटा वरचा आहे त्यावेळी आमचे सगळे खासदार उपस्थित असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या संकल्पनेतून तयार केलेल्या प्रदर्शनातून ते सगळे तुम्हाला दिसेल. आम्ही ऑपरेशन कमळ करत नाही. ऑपरेशन बाबरी देखील करतो, या शब्दात राऊत यांनी फडणवीस यांना चिमटा घेतला. जेव्हा बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हाची शिवसेना समजण्याएवढे तुम्ही मोठे नव्हता. आता आहात तर तो इतिहास चाळावा आणि आपल्या माहितीत भर घालावी, असा सल्ला राऊत यांनी फडणवीस यांना दिला.

शिवसेना हा आक्रमक आणि खरा हिंदुत्ववादी पक्ष असून या विषयावर राजकारण नव्हे तर सामान्यांना आणि समाजाला न्याय देण्याचे, त्यांचे प्रश्न सोडविण्याचे समाजकारण करणारा पक्ष आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला हीच शिकवण दिली असल्याचेही राऊत यांनी सांगितले.

(Edited by Amol Sutar)

Sanjay Raut, Devendra Fadnavis
Devendra fadnavis : प्रभू श्रीरामांवर देवेंद्र फडणवीस यांचे गीत, अमृता फडणवीस गायिका...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com