Dada Bhuse : 'त्या' शिक्षक मृत्यू प्रकरणाला राजकीय रंग.. ; शिक्षणमंत्री दादा भुसेंचे पहिल्यांदाच हिरेंच्या संस्थेविषयी थेट भाष्य

Malegaon teacher death : त्या संस्थेबाबत गंभीर स्वरूपाच्या तक्रारी माझ्याकडेही करण्यात आल्या असल्याचे मंत्री भुसे यांनी म्हटले आहे. या प्रकरणाला कोणी राजकीय रंग देत असेल तर ते योग्य नसल्याचं भुसेंनी म्हटलं.
 Dr Apoorva Heere Vs Dada Bhuse
Dr Apoorva Heere Vs Dada BhuseSarkarnama
Published on
Updated on

Malegaon Sopan Borse death case : शिक्षक सोपान बोरसे यांच्या मृत्यूनंतर मालेगावचे राजकारण तापले आहे. या प्रकरणामुळे हिरे -भुसे संघर्षाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. राज्याचे शिक्षणमंत्री असलेल्या दादा भुसे यांनी प्रथमच हिरेंच्या शिक्षण संस्थेविषयी थेट भाष्य केलं आहे.

या प्रकरणाला कोणी राजकीय रंग देत असेल तर ते योग्य नाही. त्या संस्थेबाबत गंभीर स्वरूपाच्या तक्रारी माझ्याकडेही करण्यात आल्या असल्याचे मंत्री भुसे यांनी म्हटले आहे.

शिक्षक बोरसे यांच्या मृत्यूची एसआयटीमार्फत चौकशी सुरू असून, कायदा आपले काम करीत आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर वस्तुस्थिती समोर येईल आणि त्यानुसार कारवाई केली जाईल, असेही मंत्री भुसे यांनी स्पष्ट केलं.

 Dr Apoorva Heere Vs Dada Bhuse
Dr Apoorva Heere: शिक्षकाच्या मृत्यूनं हिरे-भुसे संघर्षाला नवा ट्विस्ट! मालेगावचं राजकारण तापलं; शिक्षण विभागावर गंभीर आरोप

नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत मंत्री भुसे यांनी याविषयावर भाष्य केलं. संबंधित शाळेची पटसंख्या सुमारे ७०० दाखविली जात असली, तरी प्रत्यक्षात केवळ १०० ते १२५ विद्यार्थी उपस्थित असतात. १५ ऑगस्ट रोजीला स्वातंत्र्य दिनाचा राष्ट्रीय उत्सव साजरा होत असताना घडलेल्या प्रकाराचीही चौकशी केली जात आहे. या शाळेत सुमारे ३० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

नोकरी लावण्याच्या आमिषाने अनेकांकडून पैसे घेतल्याच्या तक्रारी असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले. तसेच अधिकाऱ्यांच्या स्कॅन केलेल्या सह्या वापरून भरती केल्याचा, कर्मचारी भरती न करता शासनाचे अनुदान घेतल्याचा, तसेच काही कर्मचाऱ्यांच्या नावावर कर्ज काढल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या सर्व बाबींची चौकशी केली जात असून, प्रकरणात कोणत्याही प्रकारचे राजकारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 Dr Apoorva Heere Vs Dada Bhuse
Dada Bhuse : अभिजीत दिपकेंचा पहिलाच दणका ; शाळांची पोलखोल होताच शिक्षणमंत्री दादा भुसेंना द्यावी लागली कबुली!

मला दिलेल्या जबाबदारीचा आणि खुर्चीचा अवमान होणार नाही, यासाठी मी प्रयत्न करीत आहे. नाशिक जिल्ह्यातही मी भेटी देऊ शकतो. यापूर्वी इतर ठिकाणी ज्या पद्धतीने भेटी दिल्या, त्याच पद्धतीने येथेही वस्तुस्थिती जाणून घेतली जाईल, असे मंत्री भुसे यांनी सांगितले.

शालार्थ आयडी’चा फैसला SIT च्या अहवालानंतर

शालार्थ आयडी घोटाळ्यासंदर्भात मंत्री भुसे यांनी सांगितले, की या प्रकरणातील पहिली कारवाई नागपूरमध्ये झाली आहे. SIT ने प्राथमिक अहवाल सादर केला असून, ही चौकशी संपूर्ण राज्यासाठी आहे. उत्तर महाराष्ट्रातील चौकशीची प्रक्रिया अद्याप सुरू व्हायची आहे. एसआयटीचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com