Dada Bhuse : शाळा दुरुस्तीचे पैसे आता थेट मुख्याध्यापकांच्या खात्यावर, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची माहिती

Direct Funds for ZP School Repairs : नाशिकमध्ये जिल्हा परिषद गुणवंत शिक्षक पुरस्कारांचे वितरण झाले. या सोहळ्यात शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी यासंदर्भात माहिती दिली व मुख्यध्यापकांना आवाहन केलं.
Dada Bhuse
Dada BhuseSarkarnama
Published on
Updated on

ZP school News : जिल्हा परिषद शाळांमधील किरकोळ दुरुस्तीच्या कामांसाठी आता प्रशासकीय मंजुरीची दीर्घ प्रतीक्षा करावी लागू नये, यासाठी थेट मुख्याध्यापकांच्या खात्यावर निधी वर्ग करण्यात येणार आहे. शाळेची रंगरंगोटी, स्वच्छतागृहांची दुरुस्ती, शुद्ध पाण्याची व्यवस्था तसेच अन्य किरकोळ कामे तत्काळ करता यावीत, यासाठी हा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली.

शाळा व्यवस्थापन समितीला विश्वासात घेऊन मुख्याध्यापकांनी हा निधी खर्च करायचे आवाहन शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केले आहे. मराठा विद्याप्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या (कै.) रावसाहेब थोरात सभागृहात शुक्रवारी (दि. १८) जिल्हा परिषद गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या वेळी मंत्री भुसे बोलत होते. या कार्यक्रमात त्यांच्या उपस्थितीत १५ गुणवंत शिक्षकांचा गौरव करण्यात आला.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या तसेच मराठी विषयात नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण लक्षणीय असल्याचे अधोरेखित करत मंत्री भुसे यांनी त्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांसह पालक तसेच ग्रामस्थ आणि प्रशासनाने सध्याच्या प्रयत्नांपेक्षा किमान २५ टक्के अधिक योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Dada Bhuse
Nashik Politics : दादा भुसेंच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षकांचा गौरव ; निमंत्रण देऊनही भाजप-राष्ट्रवादीचे प्रमुख नेते का आले नाही?

शाळा केवळ सुरू ठेवणे किंवा बंद पडण्यापासून वाचविणे हा उद्देश नसून, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, चांगले संस्कार आणि आवश्यक सुविधा मिळाल्या पाहिजेत असे मंत्री भुसेंनी सांगितले.

पुरस्कार मिळाल्याने शिक्षकांची जबाबदारी वाढली आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासोबतच संस्कार देण्याचे काम तसेच परिसरातील शाळा आदर्श करण्याचे काम शिक्षकांनी केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्हापरिषदेचे सीईओ ओमकार पवार, मविप्र सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, उपमहापौर विलास शिंदे आदी उपस्थितीत होते.

Dada Bhuse
नाशिक महापालिकेच्या लोगोमध्ये नारोशंकराची घंटा का आहे?

या शिक्षकांना मिळाला पुरस्कार

बागलाण : माधुरी सुभाष पवार, चांदवड : सतीश भाऊसाहेब अहिरे, देवळा : सतीश गोविंदराव आहेर, दिंडोरी : भिलाजी माधवराव पाटील, इगतपुरी : अवधूत रामदास खाडगीर, कळवण : सविता तानाजी भामरे, मालेगाव : मीना निशा देवरे, नांदगाव : गणेश पुंडलिक साळी, नाशिक : विवेक पुंडलिक खैरनार, निफाड : गौरी राजेंद्र गायवन, पेठ : योगेंद्र गणपत बोरसे, सिन्नर : प्रकाश दत्तू जगताप, सुरगाणा : सुधाकर कृष्णा भोये, त्र्यंबकेश्वर : संदीप दत्तात्रय गुंजाळ, येवला : योगेश बाळासाहेब माकोणे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com