Jayant Patil Vs Ajit Pawar : जयंत पाटील यांची अधिवेशनातून अजित पवारांविरोधात टोलेबाजी!

Jayant Patil Vs Ajit Pawar : अमोल कोल्हे अशा वलग्नांना घाबरण्याची गरज नाही..
Jayant Patil Vs Ajit Pawar
Jayant Patil Vs Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या दोन दिवशीय राज्यव्यापी अधिवेशनाला आजपासून शिर्डी (ता. राहाता) येथे सुरूवात झाली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अधिवेशनात सहभागी झालेल्यांचे स्वागत केले. अधिवेशनाला राज्यभरातील पदाधिकारी सहभागी झाले होते. नवीन चेहरे पुढच्या खुर्च्यांवर दिसत असल्याने उत्साह होता. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाषणाच्या सुरूवातीपासून अजित पवार गटाला टार्गेट केले. 'खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांना पाडण्याचा काहींनी विडा उचलला आहे. परंतु कोल्हेंनी घाबरण्याची गरज नाही. त्यांच्या मागे छत्रपती आणि जनतेचा आशीर्वाद आहे', असे जयंत पाटील म्हणाले. (Latest Marathi News)

Jayant Patil Vs Ajit Pawar
BJP News : अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी सार्वजनिक सुटी जाहीर करा..

राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांच्या उपस्थित पहिल्यांदाच राज्यव्यापी अधिवेशन होत आहे. अजित पवार गटाने त्यांचे अधिवेशन कर्जत (जि. रायगड) येथे घेतले. त्यामुळे शरद पवार गटाच्या अधिवेशन कोठे होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गेल्यावर्षी शिर्डी (ता. राहाता) येथे राज्यव्यापी अधिवेशन झाले होते. त्यानंतर राष्ट्रवादीत फूट पडत अजित पवार गट भाजप महायुतीबरोबर राज्याच्या सत्तेत सहभागी झाला. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या शिर्डीतील अधिवेशनाकडे संपूर्ण राजकीय धुरींचे लक्ष लागले आहे.

Jayant Patil Vs Ajit Pawar
Bjp New Party Office News : ...अखेर वनवास संपला! पुण्यात भाजप थाटणार हक्काचं 'हायटेक' ऑफिस

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासह महापुरूषांना अभिवादन करत भाषणाची सुरूवात केली. जयंत पाटील म्हणाले, "यंदाचे वर्ष संघर्षांचे वर्ष आहे. निवडणुकींचे वर्ष आहे. गेल्यावर्षी याच ठिकाणी शिबिर झाले होते. यानंतर पक्ष फुटला. काही जण सोडून गेले. जे गेले ते गेले, त्यांचा विचार करायचा नाही. परंतु जे गेले त्यांच्यामुळे मागच्यांना पुढे येण्याची संधी मिळाली. मागच्या कप्प्यात बसलेल्यांना पुढे येण्याची संधी मिळाली. एकप्रकारे मागच्यांना प्रमोशन मिळाले आहे. यामुळे सर्वांचे अभिनंदन आणि गेलेल्यांचे आभार!"

शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय वाटचालीत अनेक क्रांतीकारण निर्णय घेतले. यात महिलांच्या शिक्षणाबरोबर राजकीय आरक्षणाचे निर्णयांचा समावेश असल्याचे सांगत शरद पवार यांना मानणारी जनता देशभरात आहे. आजही त्यांच्या पाठिशी आहे. या अधिवेशनात देखील शरद पवार यांची साथ देणार्यांची गर्दी आहे. त्यांची साथ न सोडता त्यांच्याबरोबर काम करण्याची तयारी सर्वांना सुरू केली आहे. शरद पवार यांच्याबरोबर असलेल्यांना नेत्यांना त्रास देण्याचे काम केले जात आहे. अनिल देशमुख यांना तुरुंगात जाण्याची वेळ आली. नवाब मलिक यांच्यावर बेतलेला प्रसंग सर्वांना माहित आहे. असे असले तरी आपण सर्व जण शरद पवार यांच्याबरोबर आहोत, असेही जयंत पाटील यांनी म्हटले.

Jayant Patil Vs Ajit Pawar
Nagar News : दहा वर्षे मागे नेलेला नगर जिल्हा पाच वर्षात प्रगतीवर नेऊन दाखविला!

या अधिवेशनातून देशातील परिस्थितीवर भाष्य होणार आहे. त्यामुळे हे अधिवेशन सर्वांसाठी अर्थपूर्ण ठरणार आहे. देशातील परिस्थितीवर भाष्य करताना समोरच्यांकडून जाहिरात प्रचंड आहे. त्यातून ते जे काही मांडत आहे, हे सर्वांना माहित आहे. परंतु आपण बोलत नाही. आपण बोलले पाहिजे. वस्तूस्थिती मांडली पाहिजे. खरे बोलले पाहिजे. जे आपण बोलतो ते समोरचे देखील ऐकत असतात, हे लक्षात घेऊन खरे सांगितले पाहिजे, असे सांगून घरोघरी राष्ट्रवादी हा विचार पुढे नेण्यात यावा.

देशातील आणि राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती सर्वांना माहिती आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादीने आक्रोश मोर्चा काढण्यास सुरूवात केली आहे. या मोर्चांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेतकरी मोर्चात सहभागी होत आहे. त्यामुळे मोर्चाला अधिक बळ देण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पुढे यावे, असेही जयंत पाटील यांनी म्हटले.

खासदार कोल्हे डरने की बात नही -

खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांचा आक्रोश मोर्चा विशेष गाजला. या मोर्चाची दखल समोरच्यांनी घेतली. त्यामुळे त्यांना काहींनी पाडण्याची विडा घेतला आहे. जयंत पाटील यांनी त्याचा देखील समाचार आपल्या भाषणातून घेतला. खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी छत्रपतींना विचार पुढे नेला आहे. तो विचार घरोघरी पोहचवला आहे. त्यामुळे अशा वल्गनांना घाबरण्याची गरज नाही. छत्रपतींचा विचार, जनतेचा विश्वास आणि संपूर्ण राष्ट्रवादी खासदार डाॅं. कोल्हे यांच्याबरोबर आहे, असे जयंत पाटील यांनी म्हणत अजित पवारांना टोला दिला.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com