FDA Raid: धडाकेबाज कारवायांनंतर आता FDA ची अजब कारवाई! 'मास्टरमाईंड' सोडला अन् चालकालाच अडकवले

Sinnar Milk Adulteration, FDA Raid, Nashik News: सिन्नरमधील दूध भेसळ प्रकरणात एफडीएच्या कारवाईनंतर मुख्य सूत्रधाराला वाचवून चालकावरच गुन्हा दाखल केल्याचा आरोप करण्यात आला असून निष्पक्ष चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
Tukaram-Mundhe-FDA
Tukaram-Mundhe-FDASarkarnama
Published on
Updated on

Sinnar Milk Adulteration: सिन्नरमध्ये अन्न व औषध प्रशासनाने दूध भेसळ करणाऱ्या तीन संस्थांवर कारवाई केली. यामध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळीचे साहित्य जप्त करण्यात आले. मात्र पुढे यानंतर सर्वच कारवाई ठप्प झाली आहे. या संदर्भात सिन्नर येथील दूध भेसळ विरोधात पाठपुरावा करणाऱ्या भाऊसाहेब बैरागी यांनी आता थेट मंत्रालय गाठले. त्यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे याबाबत गंभीर तक्रार केली आहे. स्थानिक अधिकारी मुख्य गुन्हेगाराला वाचवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Tukaram-Mundhe-FDA
Maharashtra Politics Live Update : मयत विलास घुले हत्या प्रकरणातील एका संशयताला SIT ने घेतले ताब्यात

अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने रामपूर, कारवाडी आणि विघ्नवाडी येथील दूध संकलन केंद्रावर छापा टाकला. त्यात दिवसभर विविध भागात लपवून ठेवण्यात आलेले भेसळीचे साहित्य शोधण्यात आले. १७ लाख रुपयांचे ८,३९२ किलो दूध भेसळीची रसायने जप्त करण्यात आली.

यासंदर्भात सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हा गुन्हा टेम्पो चालका विरुद्ध आहे. यातील मूळ आरोपी आणि दूध संकलन केंद्रात भेसळ करणारे मोठे मासे अद्यापही कारवाई पासून दूर आहेत. या कारवाईनंतर तालुक्यातील दूध संकलन २४ हजार लिटरने कमी झाले. त्यामुळे गेल्या अनेक दिवस येथे हजारो लिटर दूध भेसळ केली जात होती. नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू होता.

Tukaram-Mundhe-FDA
Maharashtra Politics Live Update : मयत विलास घुले हत्या प्रकरणातील एका संशयताला SIT ने घेतले ताब्यात

याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून संबंधित संशयित दूध भेसळीचे साहित्य कुठून आणतो, कोणाला पुरवतो, दुधाचे वितरण कसे होते याची माहिती मिळत नसल्याचे तक्रारीत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. पोलिसांनीही अद्याप आरोपीला अटक केलेली नाही. यातील मुख्य संशयित आणि ज्यांच्या इशाऱ्याने हे सर्व भेसळीचे रॅकेट सुरू आहे ते मोकाट आहेत. त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी बैरागी यांनी मंत्रालयात केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com