

Kolhapur Drought Protest: गोकुळ दूध संघाच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्हा चर्चेत असताना पुन्हा एकदा दुष्काळग्रस्त मागणीसाठी चर्चेत आला आहे. गडहिंग्लज तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाने आजच्या पाचव्या दिवशी हाणामारीचे रूप धारण केले. भाजपचे नेते आणि चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या समोरच दोन गट एकमेकांच्या भिडले.
इतकेच नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात चाललेल्या घोषणाबाजीमुळे दोन गटांमध्ये हाणामारी झाली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत हा तणाव शांत केला. गडहिंग्लज तालुका दुष्काळग्रस्त करा जाहीर करावा, या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून गडहिंग्लज तहसीलदार कार्यालयासमोर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरू आहे.
आंदोलनाच्या पाचव्या दिवशी आमदार शिवाजीराव पाटील यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. या भेटीदरम्यान आमदार पाटील हे मार्गदर्शन करत असताना कार्यकर्त्यांमधून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी आली. इतकेच नव्हे तर भाजपसह राष्ट्रवादी नेत्यांची नावे घेण्याचा सल्ला आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांमधून आला. त्यामुळे संतापलेल्या समर्थक कार्यकर्त्यांनी थेट आंदोलन स्थळावरच राडा घातला.
आमदार पाटील यांच्यासमोरच हा हाणामारीचा प्रकार घडल्याने सर्वांची तारांबळ उडाली. दरम्यान घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही गटांकडून अर्वाच्य शिवीगाळ, हाणामारी सारखे प्रकार घडले. त्यामुळे उपस्थित पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाजूला करून परिस्थिती पूर्वपदावर आणली. मात्र अचानक झालेल्या या प्रकारामुळे आंदोलन स्थळी महायुती मधील वादावर चांगलीच चर्चा रंगली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.