Girish Mahajan News : तो ‘जीआर’ न्यायालयात एका दिवसात फेटाळला जाईल!

Girish Mahajan claimed that GR would not last evena day in the court-जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत सरकारला वेळ दिला पाहिजे, असे आवाहन महाजन यांनी केले.
Girish Mahajan & Manoj Jarange Patil
Girish Mahajan & Manoj Jarange PatilSarkarnama

Maratha reservation News : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्य सरकारवर मोठा दबाव आहे. त्यासाठी सरकार काम करीत आहे. मात्र, मनोज जरांगे पाटील जी अपेक्षा करतात, तसा ‘जीआर’ काढल्यास तो न्यायालयात एक दिवसदेखील टिकणार नाही, असा दावा राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केला. (Mahajan appeal Jarange Patil for a time for Maratha reservation)

मराठा (Maratha) समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी राज्य शासनाला (Maharashtra) निर्णय घेण्यासाठी वेळ द्यावा, असे आवाहन ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केले आहे.

Girish Mahajan & Manoj Jarange Patil
Sambhajiraje News : शेतकरी संकटात, धनंजय मुंडे भाषणे ठोकतात!

राज्यातील मराठा समाजाला कुणबी म्हणून दाखला द्यावा, ही मागणी कायद्याच्या चौकटीत बसणार नाही. सरसकट कुणबी म्हणून आरक्षण दिल्यास ते न्यायालयात टिकणार नसून ते पहिल्याच दिवशी फेटाळले जाईल. त्यावर तोडगा काढण्यासाठी वेळ दिला पाहिजे, असे मंत्री महाजन यांनी नाशिक येथे सांगितले.

मराठा आरक्षणाबाबत ते म्हणाले, याबाबत सर्वपक्षीय बैठक झाली असून, त्यावर तोडगा निघावा यासाठीच सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे माझी जरांगे पाटील यांना विनंती आहे की, त्यांनी उपोषण सोडावे.

Girish Mahajan & Manoj Jarange Patil
Girish Mahajan Statement: शरद पवार म्हणाले होते, ‘तुम्ही काळजी करू नका, आम्ही भाजपच्या पाठीशी’

महाजन म्हणाले, दोन दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले होते, त्यात चर्चा झाली होती. सुरुवातीस मराठवाड्यामधील मराठा समाज वेगळा आहे, असे त्यांनी सांगितले होते.

मराठवाड्यातील निजाम काळातून वेगळे झाल्यानंतर समाज कुणबी मराठा झाला. आता ते मागणी करताहेत, की संपूर्ण राज्यातील मराठा समाजाला कुणबी म्हणून दाखला द्यावा. हे कायद्याच्या चौकटीत बसणार नाही. न्यायालयातूनच आरक्षण घ्यावे लागेल.

Girish Mahajan & Manoj Jarange Patil
Nashik Shivsena News : बबनराव घोलप यांनी शिवसेनेत आपला खुंटा पक्का केला?

त्यासाठी तत्काळ ‘जीआर’ काढावा. मात्र, तत्काळ तशा स्वरूपातील ‘जीआर’ काढला तर न्यायालयीन कसोटीवर तो टिकणार नाही. या सर्व गोष्टींवर अभ्यास करण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com