Dada Bhuse News : कांदा अनुदानापासून कोणालाही वंचित राहू देणार नाही!

Guardian Minister Dada Bhuse given instructions to provide onion subsidy in two phases-शेतकऱ्यांना दोन टप्प्यांत कांद्याचे अनुदान देण्याच्या सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी प्रशासनाला दिल्या.
Dada Bhuse
Dada BhuseSarkarnama

Nashik News : कांदा उत्पादकांच्या प्रश्नाबाबत शासन विविध घोषणा करीत आहे. मात्र त्यात नेमक्या समस्या निराकरण करण्याच्या धोरणाचा अभाव असल्याने शेतकऱ्यांचा राग कमी होण्याची चिन्हे नाहीत. आता कांदा अनुदानाचा प्रश्न तीव्र बनला आहे. (Minister Dada Bhuse given instructions to marketing department on Onion issue)

नाशिकचे (Nashik) पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना (Farmers) दोन टप्प्यात अनुदान देण्याच्या सूचना केल्या. या प्रश्नावर शेतकरी संतप्त आहेत.

Dada Bhuse
Dada Bhuse News : नाशिकचं राजकारण पुन्हा तापणार ; पालकमंत्री भुसेंचा 'तो' निर्णय अन् तीन खासदारांचा 'पत्ता कट' ?

याबाबत श्री. भुसे म्हणाले, कांदा अनुदान शेतकऱ्यांना मिळण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. दोन टप्प्यांत देण्यात येणाऱ्या या अनुदानात कुणीही शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नये, अशा सूचना दिल्या आहेत. यातून कांदा उत्पादकांना दिलासा मिळेल, असा विश्वास आहे.

अनुदान वाटपात काही तांत्रिक अडचणी येत असल्यास शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचे आवाहन श्री. भुसे यांनी केले. शेतकरी मदतीपासून वंचित राहिला नको, याबाबत संबंधित यंत्रणेलाही त्यांनी सूचना केल्या.

Dada Bhuse
Maratha Reservation Agitation In Jalna : मराठा आरक्षण आंदोलन चिघळले; जालन्यात पोलिसांचा गोळीबार अन् लाठीचार्ज

मदत खात्यावर जमा होणार

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून राज्य शासनाने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. त्यानुसार ती मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. राज्यात फेब्रुवारी २०२३ च्या सुरवातीला कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सहकारी आणि खासगी बाजार समित्या, थेट पणन परवानाधारक अथवा ‘नाफेड’कडे १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ ला विकलेल्या लेट खरीप कांद्याला अनुदान देण्याचा निर्णय सरकारने २७ मार्च २०२३ ला घेतला. क्विंटलला ३५० रुपयांप्रमाणे २०० क्विंटलपर्यंत अनुदान सरकारने जाहीर केले.

Dada Bhuse
Nashik NCP News : छगन भुजबळ यांनी आपला बायोडाटा तपासून पहावा!

सहकार विभागाच्या उपनिबंधक कार्यालयातर्फे जिल्ह्यातील एक लाख ७२ हजार १५२ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ४३५ कोटी ६१ लाख २३ हजार ५७८ रुपये वर्ग करण्यासाठी आयसीआयसीआय बँकेच्या संकेतस्थळावर याद्या ‘अपलोड’ करण्याचे अंतिम टप्प्यात आहे. विभागासह बाजार समित्यांचे सचिव आणि कर्मचाऱ्यांनी कामकाज केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com