High Court exam cheating : उच्च न्यायालय भरती परीक्षेला AI च्या मदतीने कॉपी, न्यायाधीशांच्या आदेशाने परीक्षार्थीवर गुन्हा दाखल

AI cheating case : उच्च न्यायालयाच्या लिपिक व शिपाई पदासाठीच्या परीक्षेत मोबाईल नेण्यास बंदी असूनही परीक्षार्थीने मोबाईल नेला होता. त्याला AI च्या मदतीने प्रश्नांची उत्तरे सोडवताना रंगेहाथ पकडण्यात आले.
High Court exam cheating
High Court exam cheatingAI Image
Published on
Updated on

Dhule exam cheating : उच्च न्यायालयाच्या लिपिक आणि शिपाईपदासाठी रविवारी (दि. २६) एप्रिल रोजी झालेल्या लेखी परीक्षेत मोबाईलवरून ‘एआय’च्या मदतीने कॉपी करताना एक परीक्षार्थी रंगेहात सापडला. भरारी पथकाने या प्रकाराचा पर्दाफाश केला असून, परीक्षार्थीला मोबाईलसह अटक केली आहे.

येथील जिल्हा सत्र न्यायालयाच्या देखरेखीखाली रविवारी दुपारी उच्च न्यायालयाच्या रिक्त लिपिक, शिपाईपदांसाठी लेखी परीक्षा झाली. धुळे शहरातील जिजामाता कन्या हायस्कूलमधील केंद्रावर एका उमेदवाराने चक्क ‘एआय’ (Artificial Intelligence) आणि ‘गुगल’च्या मदतीने प्रश्‍नपत्रिका सोडवियाचा प्रयत्न केला. नाजीब अली तबसुम सय्यद रा. चाळीसगाव रोड (धुळे) असे या परीक्षार्थीचे नाव. २६ एप्रिल रोजी खोली क्रमांक २१ मध्ये दुपारी साडेतीन वाजेनंतर ही घटना उघडकीस आली. परीक्षार्थी शिपाईपदासाठी परीक्षा देत होता.

पर्यवेक्षकांना त्याच्या हालचालींचा संशय आला. त्यांनी त्याच्या जवळ जाऊन पाहिले असता, मनाई असतानाही नाजिब अली याने केंद्रात चोरून मोबाईल नेला होता. तो मोबाईलवर प्रश्‍नपत्रिकेचे फोटो काढून ते गुगलवर अपलोड करीत होता. ‘AI’ मोडचा वापर करून प्रश्नांची अचूक उत्तरे शोधून तो उत्तरपत्रिकेत लिहीत असतानाच त्याला पकडण्यात आले. त्याचा मोबाईल तत्काळ जप्त करण्यात आला. या परिक्षेत उमेदवारांना कोणाताही गैरप्रकार करु नये, आणि कोणत्याही प्रकारची डिजीटल वस्तू, मोबाइल फोन वैगेरे परिक्षा हॉलमध्ये घेवून येऊ नये, कोणत्याही पध्दतीची कॉपी करु नये अशा स्पष्ट सूचना होत्या. मात्र या विद्यार्थांने नियमांचे पालन केले नाही.

High Court exam cheating
Nashik TCS case : एकीकडे फरार निदा खान पोलिसांना सापडेना ; दुसरीकडे इम्तियाज जलील तिला भेटून आले, पाठीशी उभे राहण्याचा शब्दही दिला

या गंभीर प्रकाराची माहिती तत्काळ केंद्र संचालक तथा जिल्हा न्यायाधीश श्रीमती वाय. जी. देशमुख यांना कळवण्यात आली. त्यांच्या आदेशानुसार सरकारी ड्यूटीवर असलेले विजय श्रीपाद भट (रा. देवपूर) यांनी धुळे शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी संशयिताकडून मोबाईल आणि उत्तरपत्रिका जप्त केली आहे. शहर पोलिस ठाण्यात संशयित नाजिब अली याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.

High Court exam cheating
Nashik Crime : प्रकरण मिटवण्यासाठी भोंदू महेशगिरीच्या साथीदाराचा फोन, अंनिस कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांना लाच देण्याचा प्रयत्न

या घटनेमुळे महत्वाच्या परीक्षांमध्ये ‘एआय’सारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा व मोबाईलचा होत असलेला गैरवापर अधोरेखित झाला असून, परीक्षा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. स्पष्ट नियम व बंदी असूनही असे प्रकार घडत असल्याने देखरेख व्यवस्थेतील त्रुटीही समोर आल्या आहेत. यावर नियंत्रणासाठी अधिक कडक सुरक्षा उपायांची गरज असल्याचे दिसून येते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com