Congress on Ajit Pawar : आमदार खोसकर समर्थकांनी अजित पवारांचा दावा खोडला!

अजित पवारांच्या पाया पडले, म्हणजे तो आमदार त्यांच्या गटात गेला असे नाही!
MLA Hiraman Khoskar
MLA Hiraman KhoskarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Ajit Pawar News : आमदार हिरामण खोसकर हे वारकरी संप्रदायाचे आहे. ते कोणत्याही मोठ्या व्यक्तीच्या पाया पडतात, तसेच ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाया पडले. त्याचा वेगळा अर्थ लावू नये, खोसकर हे काँग्रेस सोडून जाणार नाहीत, असा दावा कॉग्रेसचे प्रदेश सचिव भास्करराव गुंजाऴ यांनी केला आहे. (If somebody touch feet of leader it doesn`t mean he will join him)

`शासन तुमच्या दारी` या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) नाशिक (Nashik) शहरात आले होते. या दौऱ्यात काँग्रेसचे (Congress) आमदार खोसकर (Hiraman Khoskar) त्यांच्या पाया पडले होते. त्यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी खोसकर हे आमचेच आहेत, असे विधान केले होते.

MLA Hiraman Khoskar
BJP New Appointments : लोकसभेआधीच भाजपने भाकरी फिरवली!

यासंदर्भात काँग्रेसचे प्रदेश सचिव भास्कर गुंजाळ म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस इगतपुरी मतदारसंघात येऊन गेले. शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवणे या हेतूने कार्यक्रम होता. या कार्यक्रमात इगतपुरीचे आमदार खोंसकर हे उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या पाया पडले होते. त्यामुळे खळबळ उडाली होती. त्यावरून राजकीय चर्चा रंगली होती.

यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी खोसकर हे नावाला कॉग्रेसमध्यें आहेत, ते तर राष्ट्रवादीचे आहेत असे वक्तव्य केले होते. त्यामुळे आमदार खोसकर कॉग्रेस पक्षाला रामराम करणार का?, अशी चर्चा सुरू होती. मात्र आमदार खोसकर हे कॉग्रेसचेच आहेत, ते कधीही कॉग्रेस पक्ष सोडणार नसल्याचे गुंजाऴ यांनी स्पष्ट केले.

MLA Hiraman Khoskar
CM Eknath Shinde : 'NDA चा निर्धार, महाराष्ट्रात महायुती ४८ जागा जिंकणार' | Shivsena | Sarkarnama

ते म्हणाले, आमदार खोसकर हे वारकरी संप्रदायातील असल्याने "पाया पड़ती जन एकमेका" हया संत तुकाराम महाराज यांच्या उक्तिप्रमाणे मतदारसंघात लहान, मोठे मतदार तसेच महीला भगिनींच्या ते पाया पडतात. यातून त्यांचा मोठेपणा सिद्ध होतो. गेल्या चार वर्षांत मतदारसंघात विकासाभिमुख अनेक योजना व कामे त्यांच्या हातून झाल्याने सर्वसामान्य मतदार समाधानी आहेत. माध्यमांत तसेच राजकीय विरोधक विनाकारण त्यांची बदनामी करीत आहेत. आमदार हिरामण खोसकर कॉग्रेस पक्षातच राहतील याचा पुनरुच्चार त्यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com