IPS Officer Transfer: 'आयजीं'सह उत्तर महाराष्ट्रातील दोन 'एसपीं'ची बदली

IPS Officers Transfer In Maharashtra: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाने राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत.
IPS Officer Transfer
IPS Officer TransferSarkarnama
Published on
Updated on

Nashik News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाने राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. त्यात, नाशिक परिक्षेत्रासह नाशिक ग्रामीण आणि जळगाव पोलिस अधीक्षकांचा समावेश आहे. नाशिक परिक्षेत्रासाठी दत्तात्रय कराळे हे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून काम पाहतील. तर, नाशिक ग्रामीणला विक्रम देशमाने आणि एस.सी.व्ही.महेश्वर रेड्डी पोलिस अधीक्षक म्हणून कार्यभार स्विकारतील. (IPS Officers Transfer In Maharashtra)

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'आयएएस' आणि 'आयपीएस' अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहे. यासाठी 31 जानेवारी ही शेवटची मुदत असल्याने गृह विभागाने राज्यातील 44 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यात उत्तर महाराष्ट्रातील तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

IPS Officer Transfer
IAS Officer Transfer: मोठी बातमी ! निवडणुकीच्या तोंडावर 17 'आयएएस' अधिकारी बदलले

सध्या कार्यरत असलेल्या विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी.शेखर यांची बदली झाली असून, त्यांच्या पदस्थापनेचे आदेश अद्याप निघालेले नाहीत. ते स्वतंत्र काढण्यात येतील. त्यांच्या जागी ठाणे शहर पोलिस दलात सहआयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या दत्तात्रय कराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कराळे यांनी 2017 मध्ये जळगाव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून यापूर्वी काम पाहिले असल्याने त्यांना मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यपद्धतीची तसेच उत्तर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींची चांगलीच माहिती आहे. नाशिक परिक्षेत्रात नाशिक ग्रामीण, धुळे, जळगाव, नंदूरबार आणि अहमदनगर जिल्ह्याचा समावेश होतो.

दरम्यान, ठाणे ग्रामीणचे विक्रम देशमाने यांच्याकडे नाशिक ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकपदाची जबाबदारी गृह विभागाने सोपवली आहे. सध्या कार्यरत असलेले शहाजी उमप यांना बृहन्मुंबईतील विशेष शाखेच्या अपर पोलिस आयुक्त पदाची सूत्रे दिलीत. दरम्यान, जळगाव जिल्ह्यासाठी एम.सी.व्ही महेश्वर रेड्डी यांची नियुक्ती गृह विभागाने केली. तर सध्या जळगावात कार्यरत असलेल्या एम.राजकुमार यांची पदोन्नतीने सोलापूर शहराचे पोलिस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली.

(Edited By-Ganesh Thombare)

IPS Officer Transfer
Ritesh Kumar Transfer : रितेश कुमारांना बढती; आता अमितेश कुमार पुण्याचे नवे पोलिस आयुक्त

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com