

Maharashtra PWD News : एकीकडे विकासाची ढाल पुढे करून राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय तोडफोड सुरू आहेत. प्रत्यक्ष स्थिती अत्यंत विरोधाभासाची असून राज्य शासनाने गेली दोन वर्षे कंत्राटदारांची बीले दिलेली नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. बीले मिळावीत यासाठी येत्या १७ ते २० जुलै दरम्यान राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व अधीक्षक कार्यालयाबाहेर आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. (Maharashtra road contractors will agitate at PWD Offices)
याबाबत महाराष्ट्र (Maharashtra Government) राज्य हॉटमिक्स कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब डी. गुंजाटे (PWD) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. त्याला रमेश शिरसाठ, अनिल सोनवणे, संजय कोठावदे, श्री. कुऱ्हाडे, सुधाकर मुळाणे, गोरखनाथ काटकर हे पदाधिकारी उपस्थित होते. एक हजारहून अधिक कंत्राटदार यावेळी उपस्थित होते.
राज्यात सुमारे आठ हजार मोठे कंत्राटदार आहेत. हे सर्व कंत्राटदार रस्ते दुरुस्ती, रस्त्यांचे व पुलाचे बांधकाम आदी कामे करतात. सार्वजनिव बांधकाम विभागामार्फत ही कामे केली जातात. सार्वजनिक बांधकाम विभागाने या कंत्राचदारांना निविदी मंजूर केल्या आहेत. वर्क ऑर्डर देण्यात आलेल्या आहेत. या कंत्राटदारांनी केलेल्या कामांची बीले राज्यभरातील विभागीय तसेच जिल्हास्तरीय कार्यालयांना सादर करण्यात आली आहेत. मात्र ही बीले मिळत नसल्याने हे कंत्राटदार अत्यंत अडचणीत आले आहेत.
या कंत्राटदारांनी सुमारे दहा हजार कोटींची बीले सादर केलेली आहेत. मात्र केवळ दहा ते बारा टक्के निधी उपलब्ध होतो. त्यामुळे या कंत्राटदारांनी बँकेकडून घेतलेले कर्ज, कच्च्या मालाचे पैसे, बँकेचे हप्ते, इंधनाची बीले, कामगारांचे पगार सर्वच थकले आहेत. कंत्राटदारांकडे पैसेच शिल्लक राहिलेली नसल्याने गंभीर समस्या आहे. पुढील आठवड्यात सर्व कामे थांबविली जातील. राज्यभरातील एकाही रस्त्यावरचा खड्डा बुजवला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. राज्य शासनाने हा विषय गांभिर्याने घ्यावा अन्यथा त्याचा गंभीर परिणाम होईल. बेरोजगारीचे संकट देखील उभे राहील, असे यावेळी गुंजाटे यांनी सांगितले.
एकीकडे आर्थिक स्थिती दिवाळखोरीसारखी असताना राज्य शासन अफाट घोषणा करीत आहे. राजकीय सोय म्हणून गेलेले कामगार संधीचा लाभ घेण्यासाठी रोज नवी कामे मंजूर केल्याचे पत्र आणून त्यात नवे संकट निर्माण करीत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थिती अत्यंत बिकट झालेली असताना त्यावर वास्तव चर्चा होत नसल्याने कंत्राटदार, अधिकारी तसेच प्रशासन संकटात सापडले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.