Islam Party : मालेगावातील विजयाने इस्लाम पक्षाचा कॉन्फिडन्स वाढला; महाराष्ट्रभर विस्ताराची तयारी..MIM पुढे नवं टेन्शन?

Islam Party Malegaon : मालेगाव महापालिकेत MIM ला पराभूत केल्याने इस्लाम पक्षाचा आत्मविश्वास वाढला असून पक्षाने आता राज्यपातळीवर आपला विस्तार करण्याची तयारी सुरु केली आहे.
Asif Shaikh,
Asif Shaikh,
Published on
Updated on

Maharashtra Politics : माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखालील इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेम्बली ऑफ महाराष्ट्र अर्थात इस्लाम पक्षाने मालेगाव महापालिका निवडणुकीत 'एमआयएम" ला धूळ चारत निर्णायक वर्चस्व प्रस्थापित केलं. इस्लाम पार्टीच्या 35 तर, समाजवादी पार्टी 5 व काँग्रेसच्या 3 नगरसेवकांना सोबत घेत बहुमताची मॅजिक फिगर गाठत इस्लाम पार्टीने मालेगावात आपला महापौर बसवला आहे.

मालेगाव महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखालील इस्लाम पार्टी व समाजवादी पार्टीच्या सेक्युलर फ्रंटने सर्वाधिक 40 जागा मिळविल्या होत्या. कॉंग्रेसच्या ३ नगरसेवकांना सोबत घेऊन त्यांनी मालेगावात सत्ता स्थापना केली. मालेगाव महापालिकेच्या महापौरपदी इस्लाम पार्टीच्या नसरीन बानो शेख खालिद तर उपमहापौरपदी समाजवादी पार्टीच्या शान ए हिंद यांची यांची वर्णी लागली.

शिवसेना १८, एमआयएम 21 व भाजपला 2 जागा मिळाल्या. मात्र एमआयएम व भाजप महापौर व उपमहापौर निवडीच्या प्रक्रियेत तटस्थ राहिल्याने इस्लाम पार्टी व समाजवादी पार्टीच्या सेक्युलर फ्रंटने शिवसेनेलाही पराभूत करत सत्ता स्थापन केली. मालेगावातील या विजयाने इस्लाम पक्षाचा कॉन्फिडन्स वाढला असून आता महाराष्ट्रभर विस्ताराची तयारी इस्लाम पक्षाने केली आहे.

Asif Shaikh,
Narhari Zirwal Bribe Case : एक लाइन म्हणजे 50 हजार, दोन लाइन म्हणजे 1 लाख; मंत्रालयात लाचेसाठी सिक्रेट कोड? व्हिडीओ व्हायरल

माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली दोन वर्षापूर्वी स्थापन झालेल्या इस्लाम पक्षाने राज्य पातळीवर आपली राजकीय वाटचाल नेणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. नुकतेच इस्लाम पक्षाचे राज्यस्तरीय संमेलन मालेगाव येथे झाले. मालेगावच्या महानगरपालिकेवर सत्ता मिळवल्यानंतर आता पक्ष केवळ शहरापुरता मर्यादित न राहता, संपूर्ण महाराष्ट्रभर संघटनात्मक बांधणी करणार असल्याचा निर्धार या संमेलनातून व्यक्त करण्यात आला.

इस्लाम पक्षाने मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत तब्बल ३५ जागांवर विजय मिळवित स्थानिक राजकारणाला नवी कलाटणी दिली. या निवडणुकीत राष्ट्रीय पातळीवर ओळख असलेल्या असदुद्दिन ओवेसी यांच्या ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन (MIM) पक्षाचा पराभव करून सत्ता मिळविणे ही इस्लाम पक्षाची मोठी राजकीय कामगिरी मानली जात आहे.

Asif Shaikh,
Supriya Sule : रोहितची काळजी वाटते, अजितदादांच्या तपासाबाबत भीती व्यक्त करत सुप्रिया सुळेंची राज्य सरकारकडे मोठी मागणी

महापालिकेतील यशानंतर राज्यभर संघटनेचा विस्तार करावा, असा ठराव पक्षाच्या राज्यस्तरीय संमेलनात एकमताने मंजूर करण्यात आला. या संमेलनात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, कोकण यांसह एकूण १२ जिल्ह्यांमधील प्रतिनिधी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे उत्तर प्रदेश, बिहार, तेलंगणा आणि गुजरात या राज्यांतील प्रतिनिधींनीही या संमेलनाला उपस्थितीती लावली होती.

इस्लाम पक्षाने महाराष्ट्रभर पक्ष विस्ताराच्या घेतलेल्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील मुस्लीमबहुल मतदारसंघांतील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राजकीय जाणकारांच्या मते दीर्घकाळ मुस्लीम मतदारांवर प्रभाव ठेवणाऱ्या एमआयएमसाठी हा विस्तार धोक्याची घंटा मानली जात आहे.

मालेगाव विधानसभा निवडणुकीत अवघ्या १६२ मतांनी माजी आमदार आसिफ शेख यांचा पराभव झाला होता. मात्र महापालिकेत एमआयएमचा पराभव करीत इस्लाम पक्षाने गणित फिरवलं. यातून स्थानिक राजकारणात इस्लाम पक्षाने आपली पकड मजबूत केली आहे.

आसिफ शेख यांनी सातत्याने MIM वर धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण केल्याचा तसेच भाजपची ‘B TEAM’ असल्याचा आरोप केला आहे. त्याच्या उलट, इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेम्बली ऑफ महाराष्ट्र हा पक्ष अर्थात इस्लाम पक्ष हा धर्मनिरपेक्ष विचारसरणीवर आधारित विकासाच्या मुद्द्यांवर राजकारण करत असल्याचा दावा पक्ष नेतृत्वाने केला.

Asif Shaikh,
Rohit Pawar : अजितदादांच्या अपघातावरुन राजकारणाचा 'र', रोहित पवारांचा विखे पाटलांवर पलटवार

याचा दाखला देताना मालेगाव महानगरपालिकेत इस्लाम पक्षाच्या ३५ नगरसेवकांमध्ये तीन हिंदू नगरसेवकांचाही समावेश असल्याचे नमूद करण्यात आले. राज्यस्तरीय संमेलनाच्या निमित्ताने पक्षाने संपूर्ण महाराष्ट्रात संघटन विस्ताराचा निर्धार व्यक्त केला असून, येत्या काळात राज्याच्या राजकारणात इस्लाम पक्ष उतरला तर एमआयएमसमोर नवा स्पर्धक दिसू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com