Jalgaon Bribe : 10 हजारांची लाच घेताना पकडलं, ZP'च्या लाचखोर अभियंत्याकडे निघाले 5 कोटींचे घबाड, एसीबीचे पथक चक्रावले

Jalgaon Bribe Case : जळगाव जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील उपविभागीय अधिकारी फक्त १० हजारांची लाच घेताना पकडले गेले. मात्र, घरझडतीत कोट्यावधींचे घबाड सापडल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.
Bribery case
Jalgaon Bribe CaseSarkarnama
Published on: 
Updated on: 

Jalgaon Bribe Case : जळगाव जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील उपविभागीय अधिकारी सतीश शिसोदे (वय ५५) याला 10 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी दोन दिवसांपूर्वी एसीबीने अटक केली होती.

तपासादरम्यान शिसोदे यांच्या अपसंपदेची चौकशी करण्यात आली. घरझडती आणि बँक लॉकरमध्ये तब्बल ५ कोटी १६ लाख ८८ हजार ३८९ रुपयांची बेहिशोबी मालमत्ता, रोकड, सोने-चांदीचे दागिने व प्लॅटिनमचा वस्तू मिळून आल्या आहेत. या कारवाईमुळे जिल्हा परिषद वर्तुळात खळबळ उडाली आहे.

रस्ता काँक्रिटीकरणाचे बिल मंजूर करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी सतीश शिसोदे यांना एसीबीने अटक केली होती. २ नोव्हेबर रोजी एसीबीने रचलेल्या सापळ्यात सहकारी अभियंत्यासह १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना शिसोदे यांना पडकण्यात आलं. न्यायालयाने शिसोदे यांना पाच नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

या कारवाईनंतर त्यांच्या घराची तसेच त्यांच्या पत्नीच्या बँक लॉकरची बुधवारी (दि. ४) तपासणी करण्यात आली. त्यात दोन किलो ५२४.१८ ग्रॅमचे सोन्याचे दागिने, ११ किलो ६३३.७ ग्रॅमचे चांदीचे दागिने, १०१.०२ ग्रॅमचे प्लॅटिनम दागिने, असा एकूण तीन कोटी ७४ लाख ९० हजार ४३० रुपयांचे दागिने जप्त केले. शिवाय शिसोदे याच्या नावे आदर्शनगरमध्ये ४५ लाख व ६५ लाख रुपयांची दोन घर आहेत. घरात २४ लाख ३९ रुपयांच्या वस्तू आहेत.

Bribery case
Gokul Chairman Election : सत्ताधाऱ्यांची सत्तेची भूक किती? यांना भस्म्या झालाय का? ; गोकुळच्या राजकारणात रोहिणी खडसेंची उडी

बँक लॉकरची तपासणी व घर झडतीतून मिळालेला सर्व मुद्देमाल एकत्रित केल्यानंतर त्याची किंमत पाच कोटी १६ लाख ८८ हजार ३८९ रुपये इतकी झाली आहे. अवघ्या १० हजार रुपयांच्या लाचप्रकरणी झालेल्या कारवाईनंतर अधिकाऱ्याच्या घरात आणि बँक लॉकरमध्ये कोट्यवधींची मालमत्ता आढळल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. या मालमत्तेच्या स्रोताबाबत पुढील तपासात काय निष्पन्न होते, याकडे आता लक्ष लागले आहे.

Bribery case
Yeola Political News : छगन भुजबळांच्या येवल्यात आमदार सुहास कांदेंची एण्ट्री, कुणाल दराडेंचा पत्ता कट होणार?

कारवाईत सहभागी पथक

उपअधीक्षक योगेश ठाकूर, निरीक्षक रेश्मा अवतारे, स्मिता नवघरे आणि त्यांच्या पथकाने घर झडती, मालमत्ता तपासणीसह विविध बँकामधील लॉकर उघडून त्याची तपासणी केल्यावर ही मालमत्ता मिळून आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.