Jalgaon DCC Bank Election : जिल्हा बँकेत मित्रपक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न, पण युती फिस्कटलीच तर भाजपचा प्लॅन B तयार

Jalgaon DCC Bank Election BJP plans : जळगावात जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत कमालीचे मतभेद निर्माण झाले आहेत. अशा स्थितीत मंत्री महाजन यांनी निवडणुकीसाठी मित्रपक्षांसोबत युतीसाठी अनुकूल असल्याचे संकेत दिले.
JDCC Bank Election 2026 BJP strategy
JDCC Bank Election 2026 BJP strategySarkarnama
Published on: 
Updated on: 

Girish Mahajan Reviews BJP Strategy for Jalgaon DCC Bank Election : जळगावात जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेपासून ते छाननीदरम्यान झालेल्या घडामोडींमुळे महायुतीतील घटक पक्षांमध्ये कमालीचे मतभेद निर्माण झाले आहेत. त्यामुळे महायुती होईल किंवा नाही याबाबत संभ्रम असून अद्याप निर्णय झालेला नाही. असे असताना मंत्री गिरीश महाजन यांनी निवडणुकीसाठी मित्रपक्षांसोबत युतीसाठी अनुकूल असल्याचे संकेत दिले आहेत.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत महायुती म्हणूनच मैदानात उतरण्याचा आपला पूर्ण प्रयत्न आहे. मात्र ऐनवेळी काही कारणास्तव युती फिस्कटली तर स्वतंत्र लढण्याचा पर्यायही खुला आहे. त्यादृष्टीने आतापासूनच प्रत्येक मतदारसंघात भक्कम तयारी ठेवा अशा स्पष्ट सूचना मंत्री गिरीश महाजन यांनी केल्या. शुक्रवारी एका हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत त्यांनी मतदारसंघ व जागेनिहाय उमेदवारी, विजयी होण्यासंबंधी शक्यता याचा आढावा घेतला.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री महाजन यांच्या उपस्थितीत भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी एमआयडीसीतील हॉटेल इन्फिनिटीत झाली. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्‍याम चौधरी व चंद्रकांत बाविस्कर, दीपक सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

JDCC Bank Election 2026 BJP strategy
JDCC Bank Election : जळगाव जिल्हा बँक निवडणूक : एका उमेदवाराला किती खर्च करता येणार? कमाल मर्यादा ठरली

मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. बँक निवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी कशा स्वरूपाचे नियोजन करता येईल, याबाबत चर्चा झाली. मंत्री महाजन यांनी सोसायटी मतदारसंघ, महिला राखीव जागा, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आदी गटनिहाय जागांवरील उमेदवारांसंदर्भात आढावा घेतला. प्रत्येक मतदारसंघात भाजपची मते किती आहेत? कुठे भाजपची ताकद मजबूत आहे. कुठे पक्ष कमी पडतो, निवडून येण्याची शक्यता किती, याबाबत त्यांनी प्रश्‍न विचारले व माहिती जाणून घेतली.

मित्रपक्षासोबत युतीचे संकेत


जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक असून शेतकऱ्यांचे प्रतिनिधी बँकेवर असणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने आम्ही आमचे उमेदवार देणार आहोत. काही तालुक्यांच्या ठिकाणी आमचे मित्रपक्ष प्रभावी आहेत. काही तालुक्यांमध्ये आमचे वर्चस्व आहे, ते डोळ्यासमोर ठेवून मित्रपक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवू, असे स्पष्ट करत मंत्री महाजन यांनी युतीचे संकेत दिले.

दरम्यान, दिवाळीनंतर पुन्हा एकदा बैठक होणार असून त्यानंतर युतीसंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

JDCC Bank Election 2026 BJP strategy
JDCC Bank Election : जागावाटपाआधीच जळगाव जिल्हा बँकेत मोठा ट्विस्ट ! महायुतीच्या तीन जागा बिनविरोध

सुमीत पाटलांच्या अर्जावर काय म्हणाले?


जिल्हा बॅंक निवडणुकीत पाचोऱ्याचे शिवसेना आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमीत पाटील यांचा अर्ज छाननीत बाद झाला. त्यामुळे शिवसेनेतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. राजकीय दबावातून अर्ज बाद झाल्याचा आरोप सुमीत पाटील यांनी केला होता. मात्र, महाजनांनी याबाबत पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना अर्ज बाद होण्यात कुणाचाही काहीही हस्तक्षेप नाही. तांत्रिक कारणांमुळे तो बाद झाला असल्याचे सांगितले. हे प्रकरण सध्या नाशिक येथील सहकार विभागाच्या सहनिबंधकाकाडे प्रलंबित आहे, ते कायद्यानुसार योग्य तो निर्णय घेतील असे मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.