Jalgaon Dudh sangh : खडसेंचा गंभीर आरोप ; महाजन, पाटलांनी खोक्यांचा वापर करून निवडणूक जिंकली!

Jalgaon Dudh sangh : खोक्यांसह साम, दाम, दंड, भेद नीती निवडणुकीत वापरली.
 Jalgaon Dudh sangh Eknath Khadase
Jalgaon Dudh sangh Eknath KhadaseSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Dudh sangh : जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत सत्तापालट घडून आले आहे. राष्ट्रवादीचे नेते व आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या सहकार पॅनलचा धुव्वा उडाला. दूध संघावर गिरीश महाजन यांच्या भाजप-शिंदे गटाने वर्चस्व राखले आहे. खडसे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. भाजप शिंदे यांच्या गटाच्या पॅनेलने निर्विवाद यश मिळवले. एकूण 20 जागांपैकी 16 जागांवर भाजप शिंदे गटाच्या उमेदवारांनी विजय संपादन केले. तर फक्त 4 जागांवर महाविकास आघाडीला समाधान मानावे लागले.

 Jalgaon Dudh sangh Eknath Khadase
Vasant More : मतभेदाचं रूपांतर मनभेदात; मोरेंनी मनातील खदखद व्यक्त करत नेत्यांची नावेच घेतली!

दूध संघात सपशेल पराभव झाल्यानंतर खडसे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांकडून खोक्यांसह साम, दाम, दंड, भेद नीती या निवडणुकीत वापरली गेली. यामुळे आमचा पराभव झाला. मात्र काही असले तरी, पराभव शेवटी पराभवच असतो. पराभव आम्हाला मान्य आहे, असे म्हणत त्यांनी विजेत्यांचं अभिनंदन ही केलं.

 Jalgaon Dudh sangh Eknath Khadase
खडसेंना सावधानतेचा इशारा! महाजन-पाटलांना उर्जा, देवकर, मोरे, पाटलांच्यामुळे 'राष्ट्रवादी'ला सलाईन!

खडसे पुढे म्हणाले, "निवडून आलेल्या संचालकांनी चांगली कामे करून दाखवावी, अशी अपेक्षा आहे. एकदा निवडणूक जाहीर झाली असताना मध्येच ब्रेक देण्यात आला, यानंतर पुन्हा नव्याने निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर झाला, असा प्रकार पहिल्यांदाच घडताना पाहिलं होतं. यामध्ये आम्हाला गाफील ठेवलं गेलं.आम्ही नक्कीच निवडणुकीत निवडून येणार, अशी आमची स्थिती होती.

आम्ही या ठिकाणी सत्तेत असताना, योग्य पद्धतीने व पारदर्शकपणे दूधसंघाचा विकास करण्याचा प्रयत्न केला. आमचा या निवडणुकीत पराभव झाला, मात्र अनेक जागा कमी मताच्या अंतराने गेल्या आहेत. या निवडणुकीत आमच्या विरोधात दोन विद्यमान मंत्री, दोन खासदार, आमदार एवढे होते. याचाही कुठेतरी विचार केला गेला पाहिजे, असेही खडसे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com