

Jalgaon News, 28 May : भाजप विधानपरिषदेसाठी कोणतीही तडजोड करण्याच्या मनस्थितीत नाही. त्यासाठी आधीच निर्णय झाला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे तडजोड करणे हा एकच पर्याय राहिला आहे.
जळगाव विधानपरिषद निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नेत्यांनी धावा सुरू केला आहे. विशेषत: मंत्री गुलाबराव पाटील यांना आपल्या मुलासाठी उमेदवारी हवी आहे. मात्र मुलाचे पुनर्वसन करण्याचा मनसुबा गुलाबराव पाटील यांना सोडून द्यावा लागेल अशी चिन्हे आहेत.
भाजपने नाशिक आणि जळगाव विधान परिषदेची जागा आपल्याकडे ठेवण्याचे आधीच निश्चित केले आहे. या जागांबाबत महायुतीतील सहकारी पक्षांची समजूत घालण्याची जबाबदारी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सोपवण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच याबाबत स्पष्ट भूमिका घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
जळगाव जिल्ह्यातील महापौर स्थायी समिती खासदार आणि विधान परिषद या सर्व जागांवर भाजपचा कब्जा आहे. गेल्या तीन वर्षांपासून विधानपरिषदेच्या निवडणुका लांबल्या होत्या. आता ही निवडणूक भाजप आपल्या खिशात घालणार हे जवळपास निश्चित आहे.
भाजपने नंदू अडवाणी आणि काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील यांना आज उमेदवारी अर्ज भरण्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेस सोडून भाजप पक्षात दाखल झालेल्या माजी खासदार उल्हास पाटील यांचे पुनर्वसन विधान परिषदेच्या जागेवर करण्याचे निश्चित असल्याचे बोलले जाते. हा निर्णय मंत्री महाजन यांच्यावर सोपविण्यात आला आहे.
जळगाव विधान परिषदेच्या जागेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जिल्ह्यातील सर्व आमदारांनी साकडे घातले होते. मात्र या संदर्भात शिंदे यांच्याकडे देखील पर्याय राहिलेला नाही. या वादात तोडगा म्हणून शिवसेनेच्या नेत्यांना जिल्हा परिषदेत पुनर्वसन करण्याचे आश्वासन मिळण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत पाठोपाठ विधानपरिषदेलाही गुलाबराव पाटील यांना गिरीश महाजन यांच्यापुढे माघार घ्यावी लागेल असे निश्चित मानले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.