Jalgaon Police : जळगाव पोलिस दलात खळबळ, हजेरी मास्तरांशी गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत दोन महिला सहायक फौजदार निलंबित

Misconduct allegation against woman ASIs in Jalgaon: हजेरी मास्तरांशी गैरवर्तन व हुज्जत घातल्याचा ठपका ठेवत, जळगावातील दोन महिला सहायक फौजदारांना थेट निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने पोलिस दलात खळबळ.
Jalgaon Police Suspend Two Woman Assistant Sub Inspectors Over Misconduct Allegations
Jalgaon Police Suspend Two Woman Assistant Sub Inspectors Over Misconduct AllegationsSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Police News: जळगावच्या जिल्हा पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या दोन महिला सहायक फौजदारांनी हजेरी मास्तरांशी गैरवर्तन करत वाद घातल्याची घटना समोर आली आहे.

पोलिस दलातील शिस्तभंगाचे हे प्रकरण गंभीर मानत जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दोन्ही महिला कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. गीता हरिशंकर कश्यप आणि श्रद्धा वसंतराव रामोशी अशी निलंबित सहायक फौजदारांची नावे आहेत.

या संदर्भात पोलिस मुख्यालयाचे राखीव पोलिस निरीक्षक प्रशांत सुगरवार यांनी दोन्ही महिला कर्मचाऱ्यांविरोधात स्वतंत्र कसुरी अहवाल तयार करून तो पोलिस अधीक्षकांकडे सादर केला होता.

त्यानुसार, १६ जुलै रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास गीता कश्यप यांनी हजेरी मास्तर संभाजी पाटील यांच्याशी शाब्दिक वाद घातला. पोलिस अधीक्षकांना पाठविलेल्या अहवालावरून माझे इन्क्रिमेंट (वेतनवाढ) थांबविल्याचे सांगत अशोभनीय वर्तन करीत मुख्यालयात गोंधळ घातला होता.

Jalgaon Police Suspend Two Woman Assistant Sub Inspectors Over Misconduct Allegations
Crime News : पहिली पत्नी जिवंत असतानाच थाटले दुसरे लग्न, विरोध होताच पोलीस कर्मचाऱ्याकडून अमानुष मारहाण; व्हिडिओ व्हायरल

या घटनेनंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी, १७ जुलै रोजी सकाळी सुमारे ११ वाजता दुसऱ्या सहायक फौजदार श्रद्धा वसंतराव रामोशी यांनी सकाळी अकराच्या सुमारास मुख्यालयात हजेरी मास्तर संभाजी पाटील यांना गाठून पोलिस अधीक्षकांना अहवाल पाठविल्यावरून वाद घातला व गैरव्यवहाराचे आरोप केले व गोंधळ घातला.

या दोन्ही प्रकरणांचा पोलिस निरीक्षक प्रशांत सुगरवार यांनी जिल्‍हा पोलिस अधीक्षकांना अहवाल सादर केला. पोलिस अधीक्षकांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत दोघा महिला कर्मचाऱ्यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

Jalgaon Police Suspend Two Woman Assistant Sub Inspectors Over Misconduct Allegations
Chandrapur Crime: भाजप आमदाराच्या दोन महिला कार्यकर्त्यांना अटक, हादरवणारं प्रकरण समोर; चंद्रपूरच्या राजकारणात उडाली खळबळ

यापूर्वी घातला होता गोंधळ

दोन्ही महिला सहायक फौजदारांच्या निलंबनाचे आदेश मुख्यालयात पोहोचताच या कारवाईची जोरदार चर्चा सुरू झाली. निलंबित महिला सहायक फौजदारांपैकी एकीने यापूर्वीही भुसावळ येथे कर्तव्यावर असताना गोंधळ घातला होता. तत्कालीन पोलिस निरीक्षकांवर हात उगारून मानहानीकारक वर्तन केल्यानेच या महिला कर्मचाऱ्यांची मुख्यालयी बदली झाली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com