

Chavan vs Khadse News : सत्ताधारी पक्षाकडून बुधवारी शासकीय भूसंपादन घोटाळ्याची चर्चा विधिमंडळात झाली. या संदर्भात शासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र ही चर्चा वेगळ्याच कारणाने गाजली.
महामार्गाच्या भूसंपादनात नवापूरला मोठा घोटाळा झाला. त्यापाठोपाठ भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी विधानसभेत याच महामार्गातील भूसंपादनाचा दुसरा घोटाळा उघड केला. हा घोटाळा थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याशी संबंधित असल्याचा दावा त्यांनी केला.
यावेळी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी सुरत महामार्ग चौपदरीकरण भूसंपादनाचा विषय मांडला. मुक्ताईनगर येथील या जमिनीच्या संपादनात शासकीय नियमांचे उल्लंघन झाले. त्यात थेट माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा संबंध आहे.
भूसंपादनाचे अधिसूचना जाहीर झाल्यानंतर संबंधित जमिनींचे कोणतेही व्यवहार होत नाहीत. मात्र श्री खडसे यांनी मुक्ताईनगर येथील ही जमीन 15.22 लाखांना खरेदी केली. ही खरेदी खत नियमबाह्य पद्धतीने नोंदविण्यात आले.
संबंधित जमीन जिरायत आणि कापसाचे पीक असलेली होती. मात्र त्यात फळबाग लावून शासनाचे पैसे लुबाडण्याचा प्रयत्न झाला. त्यात नऊ प्रकरणांमध्ये कोट्यावधी रुपयांचा मोबदला मंजूर झाला आहे. ही शासनाची फसवणूक असल्याने त्याची चौकशी करून संबंधितांविरुद्ध फौजदारी कारवाई करावी अशी मागणी केली.
या प्रकरणात थेट पैसे वितरित झाले नाही. चोरी झाली आहे. चोरीचा माल घरापर्यंत नेलेला नाही, एव्हढाच फरक आहे. असे सांगत आमदार चव्हाण यांनी खडसे यांच्या या प्रकरणात थेट चोर असा उल्लेख केला.
आमदार चव्हाण यांच्या आग्रही मागणीमुळे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या नेतृत्वाखाली 'एसआयटी'ची घोषणा केली. या प्रकरणातील दोषी हे प्रभावशाली व्यक्ती असल्याने समितीत एक आयपीएस आणि एक अतिरिक्त आयएएस अधिकारी समाविष्ट करावा, असा आग्रह आमदार चव्हाण यांनी धरला.
यावेळी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील हेदेखील आमदार चव्हाण यांच्या मदतीला धावून आले. मुक्ताईनगर येथील भूसंपादनाच्या घोटाळ्यात तात्काळ गुन्हे दाखल करावे, ही मागणी केली. खडसे यांच्या विषयी त्यांनी थेट 'दरोडेखोर' असा शब्दप्रयोग केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.