Jalgaon Cyber Crime : तुमच्या नावाचे सीम दहशतवाद्यांकडे, एटीएस अधिकारी असल्याचे भासवून शिक्षकाला 32 लाखांना लुटले

Jalgaon Cyber Crime : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत मुंबई एटीएसमधून बोलत असल्याचे भासवून सायबर भामट्यांनी सावद्यातील एका शिक्षकाला ३२ लाख ४० हजार रुपयांचा गंडा घातला.
Cyber ​​crime
Cyber ​​crimeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Savda Teacher Cheated of ₹32.40 Lakh in Cyber Fraud : दहशतवाद्यांकडे तुमच्या नावाचे सीमकार्ड असलेला मोबाइल आढळला असून, तुमच्या बँक खात्यावर दहशतवाद्यांनी सात कोटी रुपये स्वीकारल्याचा आरोप करत सायबर भामट्यांनी सावदा येथील एका शिक्षकाला लक्ष्य केले. अटक आणि समाजात बदनामी करण्याची धमकी देत या ५३ वर्षीय शिक्षकाकडून तब्बल ३२ लाख ४० हजार रुपये उकळण्यात आले. दरम्यान, तक्रार मिळताच सायबर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून फसवणुकीच्या रकमेपैकी २७ लाख रुपये होल्ड केले.

रावेर तालुक्यातील सावदा येथील हे शिक्षक २९ ऑक्टोबरला शाळेत विद्यार्थ्यांना शिकवत होते. त्याचवेळी त्यांच्या व्हॉट्सॲपवर विशाल ठाकूर नावाच्या व्यक्तीचा कॉल आला. मुंबई एटीएसमधील पोलिस उपनिरीक्षक असल्याची ओळख सांगणाऱ्या या व्यक्तीने पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांकडे शिक्षकाचा मोबाइल क्रमांक आढळल्याचा दावा केला. याशिवाय, त्यांच्या आधारकार्डचा वापर करून बँक खाते उघडण्यात आले असून, त्या खात्यात सात कोटी रुपये जमा झाल्याचे सांगण्यात आले. त्यापैकी अडीच लाख रुपये शिक्षकाने घेतल्याचा आरोपही करण्यात आला.

या आरोपांमुळे शिक्षक घाबरले. त्यानंतर भामट्यांनी त्यांना घरी जाऊन बंद खोलीत बसण्यास सांगितले. तसेच आयपीएस अधिकारी मनोजकुमार शर्मा यांना दर तासाला आपल्याबाबतची माहिती देण्याच्या सूचना केल्या. दुसऱ्या दिवशी, म्हणजेच ३० ऑक्टोबरला पुन्हा व्हिडिओ कॉल करण्यात आला. अटक टाळायची असेल आणि बदनामीपासून वाचायचे असेल तर बँक खात्यावर पैसे जमा करण्यास सांगण्यात आले.

Cyber ​​crime
Jalgaon DCC Bank Election : जिल्हा बँकेतील वादाचे पडसाद जिल्हा परिषदेपर्यंत? मंगेश चव्हाण-किशोर पाटलांमधील संघर्ष महायुतीची कसोटी पाहणार!

या धमक्यांना घाबरून शिक्षकांनी सुरुवातीला तीन लाख रुपये पाठविले. मात्र, त्यानंतरही पैशांचा तगादा सुरूच राहिला. त्यामुळे त्यांनी एसआयपी आणि अन्य बचत प्रमाणपत्रे मोडून टाकली आणि वेगवेगळ्या वेळी एकूण ३२ लाख ४० हजार रुपये भामट्यांच्या सांगण्यावरून पाठविले. एवढ्यावरही ठग थांबले नाहीत. पाठविलेल्या पैशांची सेबीमार्फत तपासणी करण्यात आली असून, ती रक्कम काळ्या पैशांची असल्याचे निष्पन्न झाल्याचे सांगत त्यांनी शिक्षकांना पुन्हा धमकावले. पोलिस, ईडी आणि अन्य तपास यंत्रणांची भीती दाखवून आणखी पैसे मागण्यात आले.

Cyber ​​crime
Jalgaon Politics : सुमित पाटलांचा फॉर्म मीच बाद करायला लावला, मीच वैध केला... मंगेश चव्हाणांच्या कबुलीने उडाली वादाची ठिणगी

संशय आल्यानंतर शिक्षकांची सायबर पोलिसांत धाव; २७ लाख रोखले

२९ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार सुरू होता. वारंवार पैशांची मागणी होत असल्याने शिक्षकांना संशय आला. त्यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात जाऊन संपूर्ण प्रकाराची तक्रार नोंदविली. या तक्रारीच्या आधारे २६ नोव्हेंबरला विशाल ठाकूर आणि मनोजकुमार शर्मा नामक व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रार मिळाल्यानंतर सायबर पोलिसांनी तातडीने संबंधित बँक खात्यांची माहिती घेत कारवाई केली. फसवणुकीच्या ३२ लाख ४० हजार रुपयांपैकी २७ लाख रुपये होल्ड म्हणजेच रोखण्यात आले आहेत. पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.