Kasara Railway News : रेल्वे रखडली, रात्री प्रवासी अडकले; महिलांसाठी धावली एसटी, परीवहन मंत्र्यांकडून चालक-वाहकावर कौतुकाची थाप

ST Bus Rushed to Help Stranded Railway Passengers at Night : कसारा रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने उंबरमाळी स्थानकावर अनेक प्रवासी रात्रीच्या वेळी अडकून पडले होते.
ST bus helps stranded passengers at Umbermali station after Kasara railway route disruption. ST driver and conductor praised by Transport Minister Pratap Sarnaik.
ST bus driver Kiran Khandvi and conductor Rakesh Patki help stranded passengers at Umbermali railway station following disruption on the Kasara railway route.Sarkarnama
Published on: 
Updated on: 

MSRTC News : मध्य रेल्वेच्या कसारा मार्गावरील वाहतूक रात्री नऊ वाजल्यापासून विस्कळीत झाल्याने उंबरमाळी रेल्वे स्थानकावर अनेक प्रवासी अडकून पडले होते. रात्रीची वेळ आणि प्रवासासाठी अन्य पर्याय उपलब्ध नसल्याने विशेषतः महिला व महाविद्यालयीन तरुणी चिंतेत होत्या.

अशा परिस्थितीत कसारा येथे थांबलेली एसटी बस प्रवाशांच्या मदतीसाठी तातडीने उंबरमाळी येथे पोहोचली. एसटी चालक आणि वाहकाने दाखविलेल्या या समयसूचकतेमुळे अनेक प्रवाशांना सुरक्षित प्रवासाचा आधार मिळाला.

रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने उंबरमाळी स्थानकावर चाकरमानी, विद्यार्थी, महिला आणि अन्य प्रवासी अडकले होते. ही बाब लक्षात येताच कसारा येथे थांबलेल्या एसटी बसचे चालक किरण खांडवी आणि वाहक राकेश पत्की यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आगारात स्थानक प्रमुख यांना माहिती दिली.

तसेच अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी बस पाठविण्याची विनंती केली. स्थानक प्रमुख पूनम देशमुख यांनीही यास दुजोरा दिल्यानंतर लालपरी तातडीने उंबरमाळी स्थानकाकडे रवाना करण्यात आली.

रात्रीच्या वेळी एसटी बस मदतीला आल्याने अडकलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. या बसमध्ये महाविद्यालयीन तरुणी आणि नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या अधिक होती. सुरक्षित प्रवासाची व्यवस्था झाल्याचे कळताच त्यांनी आपल्या पालकांना फोन करून एसटी बस मदतीसाठी आल्याची माहिती दिली. त्यामुळे प्रवाशांसह त्यांच्या कुटुंबीयांचीही काळजी मिटली. या मदतीबद्दल प्रवाशांनी चालक आणि वाहकाचे आभार मानले. त्यानंतर सर्व प्रवाशांना घेऊन एसटी बस नाशिकच्या दिशेने मार्गस्थ झाली.

ST bus helps stranded passengers at Umbermali station after Kasara railway route disruption. ST driver and conductor praised by Transport Minister Pratap Sarnaik.
Nashik FDA Action : नाशिकमध्ये तुकाराम मुंढेंच्या FDA'चा धडाका, सुप्रसिद्ध सायंतारा साबु वड्यानंतर 5 मिसळ पॉईंट्सचे परवाने निलंबित

या घटनेची दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालक किरण खांडवी, वाहक राकेश पत्की आणि संबंधित एसटी प्रशासनाचे अभिनंदन केले. ‘एसटी महामंडळ ही केवळ प्रवासी वाहतुकीची सेवा नसून, अडचणीच्या प्रसंगी सामान्य माणसाच्या मदतीला धावून जाणारी विश्वासाची यंत्रणा आहे. प्रवाशांच्या अडचणीचे गांभीर्य ओळखून तत्परतेने मदतीचा हात देणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे महामंडळाची सेवाभावी परंपरा अधिक दृढ होत आहे,’ असे त्यांनी नमूद केले.

ST bus helps stranded passengers at Umbermali station after Kasara railway route disruption. ST driver and conductor praised by Transport Minister Pratap Sarnaik.
Nashik Kumbh Mela : नाशिकच्या कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी टाळण्यासाठी प्रशासन उभारणार 'ही' खास प्रणाली, एक तास आधीच अंदाज येणार

रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने अडचणीत सापडलेल्या प्रवाशांसाठी एसटीची लालपरी आधार ठरली. चालक आणि वाहकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे महिला, विद्यार्थिनींसह अनेक प्रवाशांचा पुढील प्रवास सुखकर झाला. संकटाच्या वेळी माणुसकी जपणाऱ्या या कृतीचे प्रवाशांकडून आणि परिवहन मंत्र्यांकडून कौतुक करण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.