Nandurbar Lok Sabha Election Result 2024 Live: नंदुरबारमध्ये राजकीय भूकंप! गावितांचं संस्थान खालसा

Nandurbar Lok Sabha Election Result 2024 Live Heena Gavit Vs Gowal Padavi: नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला आहे. या मतदारसंघात काँग्रेसचा विजय झाला आहे.
Gowal Padavi
Gowal Padavi Sarkarnama

Nandurbar Lok Sabha Election Result 2024 Live: राज्यातील लोकसभेचा पहिला निकाल नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून समोर आला आहे. या निकालामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. या मतदारसंघात भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपच्या डॉ. हीना गावित विरुद्ध काँग्रेसचे गोवाल पाडवी यांच्यात या मतदारसंघात थेट लढत झाली होती.

नंदुरबार मतदारसंघ हा काँगेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात डॉक्टर विरुद्ध वकील अशा दोन सुशिक्षित उमेदवारांमध्ये लढत झाली होती. तर नुकत्याच हाती आलेल्या लोकसभेच्या निकालानुसार इथे भाजपच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांचा पराभव झाला आहे. तर काँग्रेसनेते के. सी. पाडवी यांचे पुत्र अ‍ॅड. गोवाल पाडवी विजयी झाले आहेत.

पाडवी यांच्या विजयामुळे नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हा पारंपारिक काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. 2014 च्या निवडणुकीत भाजपने काँग्रेसच्या या बालेकिल्लाला खिंडार पाडलं होतं. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मात्र भाजपला परावभाचा सामना करावा लागला असून काँग्रेसने पुन्हा हा मतदारसंघ खेचून आणला आहे.

Gowal Padavi
Vishwajeet Kadam Effort : विश्वजित कदमांनी करून दाखवलं; 19 कोटींचा निधी मंजूर करून आणला...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com