Love Dispute Assault: 4 वर्षांच्या प्रेमानंतर वाद; 'लग्न कर, नाहीतर आयशर टेम्पो दे', प्रियसीच्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी

Girlfriend assaulted boyfriend over marriage dispute : कोपरगाव न्यायालयातील प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शिरसगावात वाद; वीट फेकणे, चावा घेणे आणि दुखापत केल्याची तक्रार.
boyfriend seriously injured after girlfriend attack
girlfriend attacks boyfriend after love disputeAI Generated Image
Published on
Updated on

Maharashtra love dispute assault case: चार वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर निर्माण झालेला वाद आता हिंसक वळणावर पोहोचल्याचा प्रकार शिरसगाव येथे समोर आला आहे. प्रेमसंबंधातील वाद आणि कोपरगाव न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर एका युवतीने प्रियकराकडे लग्न करण्याची किंवा आयशर गाडी तिच्या नावावर करण्याची मागणी केल्याचा आरोप आहे.

युवकाने ही मागणी नाकारल्यानंतर त्याच्यावर वीट फेकून मारहाण केल्यासह चावा घेणे आणि गंभीर दुखापत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अस्तगाव (ता. नांदगाव, जि. नाशिक) येथील राहुल अशोक मासाळ (वय 32) हा आयशर टेम्पोच्या माध्यमातून पाण्याच्या बाटल्यांची वाहतूक करतो. त्याचे भिंगार (जि. अहिल्यानगर) येथील एका युवतीसोबत सुमारे चार वर्षांपासून प्रेमसंबंध (Love Dispute) होते. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून दोघांमधील वाद वाढला असून हे प्रकरण कोपरगाव न्यायालयातही पोहोचल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

14 ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे अडीच वाजता राहुल मासाळ शिरसगाव येथे आपली गाडी पार्क करून बिल्टी तयार करत होता. त्यावेळी संबंधित युवती तेथे आली. तिने राहुलकडे लग्न करण्याची, अन्यथा त्याची आयशर गाडी तिच्या नावावर करण्याची मागणी केल्याचा आरोप आहे. मात्र, दोघांमधील न्यायालयीन (Court) प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर पुढील निर्णय घेऊ, असे राहुलने सांगितल्याने वाद वाढल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

boyfriend seriously injured after girlfriend attack
Shrirampur Car Bonnet Drama : श्रीरामपूरात भरदिवसा थरार! चालत्या कारच्या बोनेटवर सासू; जावयाने सुसाट कार पळवली

वीट फेकल्याने हाताला दुखापत

वादानंतर संतप्त झालेल्या तरुणीने खाली पडलेली वीट उचलून गाडीच्या दिशेने फेकल्याचा आरोप आहे. गाडीचे नुकसान टाळण्याचा प्रयत्न करत असताना वीट राहुलच्या डाव्या हाताच्या पंजावर लागली. या वेळी त्याचे वडील अशोक मासाळ हे मध्यस्थी करण्यासाठी पुढे आले असता त्यांनाही शिवीगाळ आणि धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

boyfriend seriously injured after girlfriend attack
अहिल्यानगरमध्ये वाळू माफियांचा धिंगाणा! RTO अधिकाऱ्याच्या पतीला पिस्तुलाच्या धाकाने लुटले; नोकरीची धमकी देत खंडणीचीही मागणी

मोबाईल, चावी हिसकावून फेकल्याचा आरोप

तक्रारीनुसार, तरुणीने राहुलच्या हातातील मोबाईल आणि आयशर गाडीची चावी हिसकावून गवतात फेकून दिली. त्यानंतर झटापटीत राहुलच्या पाठीवर आणि डाव्या खांद्यावर चावा घेतल्याचा तसेच त्याच्या गुप्तांगाला दुखापत केल्याचा आरोप आहे.

जखमी युवकावर उपचार सुरू

या घटनेत राहुल मासाळ जखमी झाला असून त्याच्यावर साखर कामगार रुग्णालयात उपचार करण्यात आल्याची माहिती आहे. राहुलच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी संबंधित युवतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रेमसंबंध, लग्नाची मागणी, वाहनाच्या मालकीवरून झाल्याचा आरोप असलेला हा वाद आता थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला असून, या प्रकरणाची परिसरात चर्चा सुरू आहे. प्रकरणातील आरोपांची पोलिसांकडून पुढील चौकशी केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com