Jalgaon: मधुकर सहकारी साखर कारखाना विक्रीवर शिक्कामोर्तब

गुलाबराव देवकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा बँक संचालक बैठकीत एकमताने निर्णय.
Gulabrao devkar
Gulabrao devkarSarkarnama
Published on
Updated on

जळगाव : यावल (Yawal) येथील मधुकर सहकारी साखर कारखाना (Madhuar Sugar Factory) थकीत कर्जापोटी जिल्हा बँकेच्या (Jalgaon District Bank) ताब्यात होता. त्याची ६३ कोटी रुपयाला विक्री करण्यात आली आहे. या विक्री प्रक्रियेवर आज जिल्हा बँक संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे बँकेचा तोटा कमी होऊन नफ्याकडे वाटचाल करणार असल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर (Gulabrao Devkar) यांनी सांगितले. (Madhukar sugar cooperative mill was sold by District Bank)

Gulabrao devkar
पालकमंत्री दादा भुसेंनी राष्ट्रवादीच्या आमदारांची केली आर्थिक कोंडी!

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची बैठक सोमवारी बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्या वेळी उपाध्यक्ष श्‍यामकांत सोनवणे, संचालक एकनाथराव खडसे, आमदार अनिल पाटील, डॉ. सतीश पाटील, प्रदीप देशमुख, संजय पवार, कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख आदी उपस्थित होते.

Gulabrao devkar
Uddhav Thackray: मशाली पेटवून शिवसेनेच्या नवीन निशाणीचे उत्साहात स्वागत झाले

बैठकीबाबत पत्रकारांना माहिती देताना गुलाबराव देवकर यांनी सांगितले, की मधुकर सहकारी साखर कारखाना थकीत कर्जापोटी जिल्हा बँकेच्या ताब्यात होता. त्याच्या वसुलीसाठी ऑनलाइन विक्री प्रक्रियेच्या निविदा मागविण्यात आल्या. यात इंडिया बायो ॲग्रो लिमिटेडची निविदा मंजूर करण्यात आली व ६३ कोटी रुपयांना कारखान्याची विक्री करण्यात आली. आज त्या विक्री प्रक्रियेला संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने अंतिम मंजुरी देण्यात आली आहे.

कंपनीने निविदा भरताना दहा टक्के रक्कम भरली आहे. सात दिवसांत १५ टक्के रक्कम भरणार आहे. नियमानुसार त्यांनी पूर्ण ७५ टक्के रक्कम एका महिन्यात भरावयाची आहे. मात्र, त्यांनी तीन महिन्यांचा कालावधीचे मागणी करणारे पत्र दिले आहे. तीन महिन्यांपैकी एक महिन्यानंतर पुढील दोन महिने जी रक्कम भरणार आहे. त्यावर अकरा टक्के व्याज आकारण्यात येणार आहे. तीन महिन्यांत पूर्ण रक्कम भरल्यावर त्यांना ताबा देण्यात येईल. मात्र १५ टक्के रक्कम भरल्यावर त्यांना कारखाना साफसफाई करण्यासाठी त्यांच्या मागणीनुसार देण्यात येईल. कारखाना या हंगामात सुरू करण्यात येणार आहे.

साखर विक्रीस परवानगी

कारखान्याची वीस कोटी रुपयाची साखर न्यायालयाच्या आदेशानुसार सील करण्यात आली आहे. कारखाना विक्री झाल्यानंतर शेतकऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची देणी कंपनीने करावयाची आहेत. कंपनीने पूर्ण रक्कम भरल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार सील करण्यात आलेली साखर विक्रीबाबत ना हरकत पत्र जिल्हा बँक देईल. त्यामुळे ही साखर विक्री करण्याचा अधिकारी कंपनीस असेल व कंपनी त्या विक्रीतून शेतकऱ्यांची उसाची देणी व कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम व इतर देणी अदा करेल. यात शेतकऱ्यांचे सोळा कोटी व कर्मचारी प्रॉव्हिडंट फंडाची साडेतीन कोटी रुपयांची रक्कम देणी आहेत.

यावल सूतगिरणी विक्रीलाही मंजुरी

यावल येथील जे. टी. महाजन सूतगिरणीही थकीत कर्जापोटी बँकेच्या ताब्यात होती. या सूतगिरणीचीही ऑनलाइन प्रक्रियेप्रमाणे उद्योजक डॉ. शैलेश खाचणे यांना साडेसात कोटी रुपयांत विक्री करण्यात आली. त्या विक्रीलाही संचालकांनी एकमताने मंजुरी दिल्याची माहिती देवकर यांनी दिली.

बँक तोट्यातून नफ्याकडे

मधुकर सहकारी साखर कारखाना व यावल येथील जे. टी. महाजन सूतगिरणी विक्रीमुळे बँकेला ७० कोटी रुपये येणार आहेत. त्यामुळे बँकेचा तोटा कमी होऊन बँक मार्च २०२३ मध्ये नफ्यात येईल, अशी माहिती देवकर यांनी दिली. ते म्हणाले, की बँकेला ९७ कोटी रुपयांचा तोटा आहे. विक्रीतून येणारी ७० कोटीची रक्कम वगळ्यास २७ कोटी रुपयांचा तोटा राहील. त्यानंतर चालू वर्षाच्या नफ्यातून तोट्याची रक्कम कमी होईल. आगामी वर्षात बँक फायद्यात येईल. तसेच कारखाना सुरू झाल्यामुळे शेतकरी व कामगारांचाही फायदा होईल.

...

एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील वसंत सहकारी साखर कारखाना थकीत कर्जापोटी बँकेच्या ताब्यात आहे. न्यायालयाचा स्थगिती आदेश उठल्यानंतर त्याच्या विक्रीची प्रक्रियाही सुरू करण्यात येईल.

-गुलाबराव देवकर, अध्यक्ष, जळगाव जिल्हा बँक

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com