Chhagan Bhujbal : ‘आम्हाला अर्थखातेच पाहिजे’; भुजबळांनी 'त्या' दोन चर्चा फेटाळल्या, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर स्पष्टच सांगितलं!

Chhagan Bhujbal Meets Devendra Fadnavis at Varsha Bungalow : अर्थखात्यासाठी राष्ट्रवादीने हालचाली गतिमान केल्या असून त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली. आता मुख्यमंत्री काय भूमिका घेतात हे पाहण्यासारखे ठरेल. फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधला.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on: 
Updated on: 
Summary

भेटीत राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. तसेच राष्ट्रवादीकडून 5 मंत्री बदलण्यात येणार असल्याची चर्चा आहे. या दोन्ही चर्चा भुजबळांनी फेटाळल्या. तसे काहीही नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Maharashtra Politics : राज्यातील फडणवीसांच्या मंत्रिमंडळात फेरबदल पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यात राष्ट्रवादीकडून 5 मंत्री बदलण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मात्र, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. तसेच अर्थखात्यासंदर्भातही त्यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

अर्थखाताच्या मागणीसाठी आज राष्ट्रवादीच्या सर्व प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. भेटीनंतर छगन भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भुजबळांसोबत मंत्री हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जय पवार हेही उपस्थितीत होते.

छगन भुजबळ म्हणाले, हे खरं आहे की, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर गेलो होतो. परंतु राष्ट्रवादीचे विलिनीकरण होणार, फेरबदल होऊन 5 मंत्री बदलण्यात येणार अशा बातम्या येत आहेत त्या चुकीच्या आहेत. अशी कोणतीही चर्चा बैठकीत झालेली नाही. अर्थखातं लवकरात लवकर राष्ट्रवादीला द्या एवढीच मागणी आम्ही फडणवीसांकडे केल्याचे भुजबळांनी सांगितलं.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal News : 500 कोटींवर कोण विश्वास ठेवेल? जरांगेंची ऑडिओ क्लिप म्हणजे निव्वळ गप्पा, भुजबळांचा टोला

फडणवीस देखील त्याबाबत सकारात्मक होते. आम्ही जरुर अर्थ खातं राष्ट्रवादीला देणार, त्या बद्दल काही वाद नाही असं त्यांनी सांगितलं. राज्यात सध्या दुष्काळाची परिस्थिती आहे, निधीची जुळवाजुळव सुरु आहे. ते जरा पाहतो आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांनाच अर्थ खाते देणार असं फडणवीसांनी सांगितल्याचे भुजबळ म्हणाले.

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वीच हे खातं राष्ट्रवादीला मिळेल. दिल्लीकरांनी सर्व अधिकार फडणवीसांना दिले आहेत. त्यांची काही अडकाठी नाही. मुख्यमंत्र्यांनी नेमकी कधी देणार याची तारीख सांगितली नाही. दुष्काळात शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी फार मोठा निधीची तरदूत करावी लागत आहे. सध्या त्याचा ते अभ्यास करत आहेत. मात्र, अर्थखातं सुनेत्रा पवारांनाच देणार हे सांगितल्याचे भुजबळ म्हणाले.

Chhagan Bhujbal
Nashik Kumbh Mela : राष्ट्रपतींच्या हस्ते कुशावर्त व त्र्यंबकेश्वर मंदिरात किती मिनिटे पूजा? वेळापत्रक ठरलं.. प्रशासनाचं अचूक नियोजन!

दरम्यान भाजप अर्थखाते स्वत:कडे ठेऊन राष्ट्रवादीला त्याबदल्यात दुसरे खाते दिले जाऊ शकते अशी चर्चा आहे. त्यावरही भुजबळांनी स्पष्टच सांगितलं की, आम्हाला अर्थखातेच हवे आहे. सुनेत्रा पवार आमच्या उपमुख्यमंत्री आहेत. अर्थखाते आम्हाला परत मिळायला हवे. आमचे हक्काचे ते खाते आहे अशी भूमिका भुजबळांनी मांडली.

देवाण घेवाण चालूच असते आम्ही काँग्रेससोबत होतो त्यावेळी देखील असं घडत होतं. आमची जागा एखादी घेतली तर दुसरी पुन्हा आम्हाला मिळत होती असही भुजबळ म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com