FDA Scam : तुकाराम मुंढेंच्या FDA विभागात मोठी खळबळ! नाशिकच्या सहाय्यक आयुक्तांसह पाच अधिकारी निलंबित!

Supari Seizure Case : दोन दिवसांपूर्वीच अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विभागातील अधिकाऱ्यांना त्यांच्या नियमित कार्यक्षेत्राबाहेर जाऊन छापे टाकण्यास आणि कारवाई करण्यास मनाई केल्याची माहिती दिली होती. या निर्णयामुळे प्रशासकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते.
FDA Scam | Tukaram Mundhe | Supari Seizure Case
FDA Scam | Tukaram Mundhe | Supari Seizure Casesarkarnama
Published on: 
Updated on: 

Nashik News, 19 Oct :अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कामाची राज्यभर चर्चा सुरू असतानाच, याच विभागातील गंभीर गैरव्यवहार समोर आला आहे. मालेगावमध्ये जप्त करण्यात आलेली सुमारे १० कोटी रुपये किमतीची खाण्यास अयोग्य सुपारी नष्ट केल्याचा अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात आला होता.

मात्र, प्रत्यक्षात ही सुपारी नष्ट न करता व्यापाऱ्यांशी संगनमत करून प्रक्रियेसाठी पाठविण्यात आल्याचे चौकशीत उघड झाले आहे. या प्रकरणी पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. मालेगाव येथे ४ मार्च २०२५ रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या धुळे आणि नाशिक येथील पथकाने मोठी कारवाई केली होती.

यावेळी ११ ट्रकमधून वाहतूक केली जात असलेली खाण्यास अयोग्य सुपारी जप्त करण्यात आली होती. या सुपारीची किंमत जवळपास १० कोटी रुपये होती. कारवाईनंतर जप्त केलेली सुपारी नष्ट करण्यात आल्याचा अहवाल संबंधित अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना पाठविला होता.

FDA Scam | Tukaram Mundhe | Supari Seizure Case
Tiger Shroff car firing : टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरारक घटनाक्रम

मात्र, या अहवालाच्या सत्यतेबाबत संशय निर्माण झाल्यानंतर वरिष्ठ स्तरावर चौकशी सुरू करण्यात आली. स्थानिक व्यापाऱ्यांनीही यासंदर्भात तक्रारी केल्या होत्या. चौकशीत जप्त केलेली सुपारी प्रत्यक्षात नष्ट करण्यात आली नसल्याचे समोर आले. संबंधित अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांशी संगनमत करून ही सुपारी प्रक्रियेसाठी पाठविल्याचे तपासात स्पष्ट झाले.

या गंभीर प्रकाराची दखल घेत प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे. नाशिकचे सहआयुक्त अविनाश दाभाडे, अमित रासकर आणि गोपाळ कासार, मुंबईचे सहआयुक्त योगेश देशमुख तसेच धुळे येथील सहाय्यक आयुक्त सुवर्ण महाजन या पाच अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासनातील ही मोठी प्रशासकीय कारवाई मानली जात आहे.

FDA Scam | Tukaram Mundhe | Supari Seizure Case
Gokul Election : 'गोकुळ'चा आज निकाल! राजकीय नेत्यांसाठी सत्ता का महत्त्वाची? सतेज पाटील की महायुती...

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विभागातील अधिकाऱ्यांना त्यांच्या नियमित कार्यक्षेत्राबाहेर जाऊन छापे टाकण्यास आणि कारवाई करण्यास मनाई केल्याची माहिती दिली होती. या निर्णयामुळे प्रशासकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते.

मात्र, मालेगावमधील सुपारी प्रकरणातील गैरव्यवहार समोर आल्यानंतर या निर्णयामागील पार्श्वभूमीही चर्चेत आली आहे. जप्त केलेल्या सुपारीची परस्पर विल्हेवाट लावण्यात आल्याचा प्रकार गंभीर मानला जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांचे व्यापाऱ्यांशी वैयक्तिक संबंध असल्याचे प्रशासनाच्या कारवाईतून समोर आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com