एकनाथ शिंदेंनी अमित शाहांकडे केली दादांची तक्रार, शाहांनी काय उत्तर दिलं..? राऊतांनी सांगितलं..

Eknath Shinde’s Complaint Against Ajit Pawar To Amit Shah : एकनाथ शिंदेंनी अजित पवार यांची तक्रार करत आम्हाला निधी मिळत नाही असं जे टुमणं लावलं त्यावर अमित शहांनी काय उत्तर दिलं ते फार महत्त्वाचं आहे. ते उत्तर मला माहित असल्याचं संजय राऊत म्हणाले.
Ranjay Raut
Ranjay RautSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्यासोबतच्या भेटीत अजित पवार यांच्या अर्थखात्याविषयी तक्रार केली होती. त्यावर अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांना दिलेलं उत्तर महत्वाचं असून ते माझ्याकडे आहे. ते लवकरच सगळ्यांच्या समोर येईल, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे १६ एप्रिलला नाशिकमध्ये शिबिर आहे. त्यानिमित्त संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी माध्यमांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांची अमित शाह यांच्याकडे तक्रार केली असून त्यावर अजित पवार काही बोलत नसले तरी तेही चिंताग्रस्त आहेत असं राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे व त्यांच्या गटावर निशाणा साधला.

Ranjay Raut
Sanjay Raut Politics: संजय राऊत यांचे चंद्रकांत पाटील यांना सडेतोड उत्तर, तुम्ही शिवसेना उद्धव ठाकरेंची...

यावेळी राऊत म्हणाले, अमित शहांकडे एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांची तक्रार केली आहे. अजित पवार आमच्या फाईली मंजूर करत नाहीत, आम्हाला निधी देत नाहीत अशी तक्रार एकनाथ शिंदेंनी केली आहे. आम्हाला निधी देत नाहीत म्हणजे नक्की कोणाला? असा प्रश्न आमच्यासारख्यांना पडतो. तुमचे जे पाच-पंचवीस गद्दार आमदार आहेत. ते केवळ निधी आणि पैशांसाठीच तुमच्यासोबत राहिले आहेत, या राज्याची तिजोरी लुटण्याची परवानगी त्यांना हवी आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

राऊत पुढे म्हणाले, एकनाथ शिंदेंनी अजित पवार यांची तक्रार करत आम्हाला निधी मिळत नाही असं जे टुमणं लावलं त्यावर अमित शहांनी काय उत्तर दिलं ते फार महत्त्वाचं आहे. ते उत्तर मला माहिती आहे. ते काय म्हणाले हे जर लोकांसमोर आलं तर राज्याचं चित्र स्पष्ट होईल. पुण्यामध्ये पहाटे संवाद झाला तेव्हाचा संवाद जशाच्या तसा खरा ठरला. त्याचा कोणी इन्कार केला नसल्याचं राऊत म्हणाले.

Ranjay Raut
Malegaon Politics : प्रसाद हिरेंचा काँग्रेसला मोठा धक्का! आज भाजपमध्ये प्रवेश करणार

ही सगळी माहिती तुम्हाला कोण देतं असा सवाल पत्रकारांनी केल्यानंतर संजय राऊत यांनी त्यावरही उत्तर दिलं. ते म्हणाले, माझं नाव संजय राऊत आहे, हा संजय महाभारतातही होता. जो सर्व चित्र डोळ्यात कानात साठवायचा, आमच्याकडे लोकं आहेत ना, ते महत्त्वाचे लोक आहेत. ते उत्तर फार इंटरेस्टिंग आहे. अमित शहांनी काढेलली समजूत काढली ती पत्रकार म्हणून माहिती घेण्याचा प्रयत्न करा. एक दिवस भाजपच्या गोटातूनच समजेल, अस संजय राऊत म्हणाले.

त्यानंतर नाशिकमध्ये होत असलेल्या शिबीराबाबत माहिती देताना आदित्य ठाकरे हे आजच नाशिकमध्ये सायंकाळी येणार आहेत. तर उद्धव ठाकरे हे उद्या दुपारी नाशिकला येतील. त्यांच्या उपस्थितीत शिबीराचा समारोप होईल. तर आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची माहिती यावेळी राऊत यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com