Shiv Sena vs Islam Party Malegaon: भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने मालेगाव शहरात आक्रमक राजकारण केले. त्यासाठी हिंदुत्वाचा आधार घेण्यात आला. मालेगावच्या या पारंपारिक राजकारणाला इस्लाम पक्षाने सत्तेत येतात उत्तर दिले आहे.
मालेगाव महापालिकेच्या महापौरपदी नसरीन बानो शेख तर उपमहापौरपदी शानेहिंद निहाल अहमद यांची निवड झाली. इस्लाम आणि समाजवादी या दोन पक्षांनी एकत्र येत काँग्रेसच्या मदतीने सत्ता स्थापन केली. त्याला आव्हान देण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला होता.
मालेगाव शहराला बांगलादेशी नागरिकांचे आश्रयस्थान असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सातत्याने हिणवले. महापालिकेच्या निवडणुकीत शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी हिंदुत्वाचे कार्ड खेळले. त्यामुळे हिंदू बहुल भागातील १८ जागा जिंकण्यात शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष यशस्वी झाला.
महापौरपदाच्या निवडणुकीत हिंदुत्वाचे राजकारण करणाऱ्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने 'एमआयएम' ला चुचकारले होते. त्यासाठी आमदार मौलाना मुक्ती इस्माईल आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांची पडद्यामागून खलबत्ते झाली. मात्र काँग्रेसने त्याला दाद न दिल्याने हे राजकारण फसले.
या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजकारणाला शह देण्याचा मोठा डाव इस्लाम पक्षाने खेळला आहे. पक्षाचे नेते माजी आमदार आसिफ शेख यांनी सातत्याने निधर्मी राजकारण करीत असल्याचे म्हटले होते. त्याला साजेसा आणि धाडसी निर्णय घेऊन महापौरांनी हिंदुत्वचा राजकारणाची कोंडी केली आहे.
इस्लाम पक्षाच्या महापौर नसरीन बानू यांनी बुधवारी पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी भाजपच्या बनावट दाखले प्रकरणाला थेट आव्हान देण्याचा इशारा दिला. यानिमित्ताने आगामी राजकारणाची दिशा त्यांनी स्पष्ट केली.
यावेळी एक धाडसी आणि अनपेक्षित निर्णय महापौरांनी जाहीर केला. घराच्या सायने परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा मनोदय त्यांनी जाहीर केला. त्यांच्या या निर्णयाने हिंदुत्वाचे राजकारण करणाऱ्या शिक्षण मंत्री दादा भुसे आणि भाजपला चपराक बसणार आहे.
मालेगाव शहर सातत्याने राज्याच्या राजकारणात चर्चेत राहिले आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपने या शहराला आपल्या राजकारणातून वजा केले होते. त्यामुळे सातत्याने माजी खासदार सोमय्या यांनी बांगलादेशी आणि रोहिंग्या नागरिकांबाबत आरोप केले. या आरोपाच्या माध्यमातून राज्यातील मतांचे ध्रुवीकरण करून लाभ उठविण्याचा भाजपचा प्रयत्न होता.
मात्र इस्लाम पक्षाने सत्तेत येतात या राजकारणाला कृतिशील उत्तर दिले आहे. महापौर नसरीन बानू यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची घोषणा केली. या घोषणेने अनेकांना राजकीय आश्चर्याचा धक्का दिला आहे. विशेषतः मालेगाव शहराशी संबंधित शिक्षण मंत्री भुसे यांच्या राजकारणाला हे आव्हान मानले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.