Manikrao Kokate : राष्ट्रीय अध्यक्ष फक्त सुनेत्रा पवारच होणार, माणिकराव कोकाटेंनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितलं..

Manikrao Kokate says Sunetra Pawar to Be the Only National President of NCP : सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोण बसणार यावरुन घमासान सुरु आहे.
Manikrao Kokate,Sunetra Pawar
Manikrao Kokate,Sunetra Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (दि. २८ जानेवारी २०२६) रोजी बारामती येथे विमान अपघातात निधन झालं. त्यानंतर त्यांच्या जागेवर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी शनिवार (दि. ३१ जानेवारी २०२६) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार? हा प्रश्न उपस्थितीत झाला असून त्यासंदर्भात जोरदार चर्चा सुरु आहेत. त्यावरुन मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत.

दरम्यान आज भाजप नेते तथा केंद्रीयमंत्री पियुष गोयल यांनी एका मुलाखतीत थेट प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष बनल्याचं सांगितलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा एकच उधाण आलं. त्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व आमदार माणिकराव कोकाटे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष फक्त सुनेत्रा पवारच होणार असं कोकाटे यांनी ठणकावून सांगितलं आहे.

माणिकराव कोकाटे म्हणाले, अजित पवार यांच्या उत्तराधिकारी सुनेत्रा पवार याच असणार आहे. सुनेत्रा पवार सोडून पक्षाचा दुसरा राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाही. सुनेत्रा पवारच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष होतील. त्या उपमुख्यमंत्री, विधिमंडळ पक्षाच्या नेत्या असतील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा सुनेत्रा पवारच असतील असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांचे निधन झाले त्यावेळीही कोकाटे यांनी हे सांगितलं होतं. आज भाजप नेते गोयल यांनी केलेल्या दाव्यानंतर कोकाटे यांनी पुन्हा सुनेत्रा पवार याच राष्ट्रीय अध्यक्ष असतील हे पुन्हा एकदा ठणकावून सांगितलं.

Manikrao Kokate,Sunetra Pawar
Ajit Pawar Asthi Kalash : स्व. अजितदादा पवार यांचा अस्थिकलश छगन भुजबळ घेऊन येणार; नाशिक व येवल्यात दर्शनासाठी ठेवणार

सह्या करो किंवा न करो, आमची चर्चा झाली आहे. दादांच्या उत्तराधिकारी या सुनेत्रा वहिनीच असतील आणि सगळ्या महत्वाच्या पदावर वाहिनीच असतील हे कोकाटेंनी अगदी ठणकावून सांगितलं. कोकाटे म्हणाले, पक्षाच्या विलिनीकरणाबाबतचा प्रश्न हा कौटुंबिक आहे. त्या संदर्भात सुनेत्रा वाहिनींसोबत दादांची चर्चा झाली असेल. आम्ही कोणी त्या चर्चेत सहभागी नव्हतो. त्यामुळे आम्हाला कुणालाही त्यासंदर्भात काही माहिती नाही. जोपर्यंत माहिती मिळत नाही, तोपर्यंत आम्ही काही बोलणार नाही. जी चर्चा आहे ती वहिनींसोबत अजितदादांनी केली असेल. सगळे वहिनींसोबत चर्चा करतील आणि त्या जो निर्णय घेतील, तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल असं कोकाटे यांनी स्पष्ट केलं.

पियुष गोयल यांचा यु टर्न

दरम्यान चर्चांणा उधाण आल्यानंतर भाजप नेते तथा केंद्रीयमंत्री पियुष गोयल यांनी आता आपल्या वक्तव्यापासून यु टर्न घेतला आहे. एका मुलाखतीत थेट प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष बनल्याचं त्यांनी सांगितलं होतं. पण, आपल्याला एका वरिष्ठ पत्रकाराकडून चुकीची माहिती मिळाल्याचे गोयल यांनी स्पष्ट केले आहे. माझी माहिती चुकीची असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करत आहे, असे म्हणत गोयल यांनी घडल्या प्रकाराबद्दल पडदा टाकला. तसेच चुकीच्या माहितीबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला आहे.

Manikrao Kokate,Sunetra Pawar
Sunetra Pawar : ना भुजबळ, ना पटेल, ना तटकरे ; अजितदादांच्या खास दोस्ताने फिरवली सगळी सूत्र, म्हणूनच सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पद

याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही सोशल मीडीयावर पोस्ट करत आपल्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीचे वृत्त फेटाळले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आपली नियुक्ती झाल्याचे वृत्त पूर्णपणे निराधार आणि तथ्यहीन असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com