Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या कुणबी नोंदी या स्वातंत्र्यपूर्व काळातील आहेत. स्वातंत्र्यानंतर जन्म - मृत्यू दाखल्यांवर कुणबी लिहिणे बंद झाले. याच नोंदींच्या आधारे सग्या-सोयऱ्यांना आरक्षणाचा हक्का मिळावा, यासाठी समाजाने लढाई उभी केली. मंत्री छगन भुजबळांना हा इतिहास माहिती आहे किंवा नाही, हे ठाऊक नाही. मात्र, मराठा आणि ओबीसीबांधवांमध्ये वितुष्ट निर्माण करून ते राजकीय पोळी भाजण्याचे काम करीत आहे. (Maratha Reservation Vs Chhagan Bhujbal)
राज्यात अनेक कारखानदार, संस्थाचालक मराठा आहेत. मराठा समाज आर्थिक मागासवर्गात मोडत नसल्याचे समोर आल्याने सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाविरोधात निर्णय दिला होता, असे भुजबळ म्हणाले. याबाबत प्रतिक्रिया देताना शिवाजी सहाणे यांनी सांगितले की, राज्यात 5 कोटी लोकसंख्या मराठा समाजाची आहे. या समाजात आर्थिक विषमता आहे. राज्यात फक्त 72 साखर कारखानदार मराठा समाजाचे आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मराठा आरक्षणाचा लढा हा अशा मूठभर संस्थाचालकांसाठी नाही. तसेच समाजातील काही व्यक्ती श्रीमंत आहेत, म्हणून त्या समाजातील गरिबांना आरक्षण का नाकारायचे ? हे कोणत्या कायद्यात बसते? भुजबळांनी केलेल्या दाव्यात तथ्य नाही. तसेच भुजबळ हजारो कोटी रुपयांचे मालक आहेत. त्यांचे कारखाने, शैक्षणिक संस्था आहेत.
मग सरसकट ओबीसी समाजाला आरक्षणाची गरज नाही, असा अर्थ होतो काय, अशी संतप्त प्रतिक्रिया सहाणे यांनी व्यक्त केली. 70 वर्षांपुढील व्यक्तींना राजकीय संन्यास देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. भुजबळ मात्र त्यांच्याचसोबत बसून खुर्ची उबवण्याचे काम करतात. त्यांनी आता राजकीय संन्यास घ्यावा आणखी पापे करू नयेत, अशी टीका सहाणे यांनी केली.
भुजबळ ओबीसी समाजाचे नेते नाहीत...
छगन भुजबळ संपूर्ण ओबीसी समाजाचे नेते कधीच नव्हते. ते फक्त एका विशिष्ट गटाचे प्रतिनिधित्व करतात. हा गटसुद्धा आता त्यांच्या मागे नाही. मनोज जरांगे हे समाजाचे नेते आहेत. ते एकटेच लढले. त्यांनी कोणाच्या मदतीच्या कुबड्या घेतल्या नाहीत. याउलट भुजबळांचे आहे. त्यांना इतरांची मदत घ्यावी लागते. दोन दिवसांपासून ते एकत्रित होण्याचे आवाहन करीत आहेत.
ओबीसी समाजाला वास्तव माहिती आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील नोंदींचा शोध घेतला आहे. त्याआधारे प्रमाणपत्र मिळणार असून भुजबळ हा आकडा आताच तयार केल्याप्रमाणे दाखवतात. यातून ओबीसी समाजाला मराठा समाजापुढे उभे करण्याचा प्रयत्न करतात. भुजबळांनी तयार केलेले कृत्रिम स्वपर्व आता संपले आहे. आपले थोडफार शिल्लक राजकीय उपद्रवमूल्य सिद्ध करण्यासाठी त्यांचा खटाटोप सुरू असल्याची टीका सहाणे यांनी केली.
(Edited by Amol Sutar)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.