खासदार भामरे यांच्याकडून श्रेयवादासाठी पुलाचे दुसऱ्यांदा भूमिपूजन!

निमगूळ येथे बोरी नदीवरील पुलाच्या कामाचे भूमिपूजन खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत झाले.
MP Dr Subhash Bhamre & BJP leaders
MP Dr Subhash Bhamre & BJP leadersSarkarnama
Published on
Updated on

धुळे : निमगूळ (ता. धुळे) (Dhule) येथील बोरी नदीवरील पुलाच्या कामाचे नुकतेच काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. यानंतर भाजपचे खासदार डॉ. सुभाष भामरे (Subhash Bhamre) यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन झाले. त्या वेळी आमदारांनी पुलाच्या कामाचे भूमिपूजन करून आपले हसे करून घेतले व श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका करण्यात आली.

MP Dr Subhash Bhamre & BJP leaders
खासदार गोडसेंचा चिमटा, देवयानी फरांदेंना ४ वर्षांनी जाग आली काय?

निमगूळ (ता. धुळे) येथील निमगूळ ते नवे गावास जोडणाऱ्या बोरी नदीवरील बहुप्रतीक्षित पुलाच्या कामाचे भूमिपूजन माजी संरक्षण राज्यमंत्री व खासदार डॉ. भामरे यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ नेते गजानन पाटील अध्यक्षस्थानी होते.

MP Dr Subhash Bhamre & BJP leaders
गिरीश महाजनांच्या लेकीच्या लग्नात चर्चा फक्त अमृता फडणवीसांची!

भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष तसेच शिरूड गटाचे जिल्हा परिषद सदस्य आशुतोष पाटील म्हणाले, की केंद्र सरकारच्या वित्त समितीचे सदस्य खासदार डॉ. भामरे यांच्या प्रयत्नांतून नाबार्ड अर्थसहाय्यातून चार कोटी ४९ लाखांचा निधी पुलासाठी मंजूर झाला. तीन दिवसांपूर्वी भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे नियोजन जाहीर केले. तरीही आमदार कुणाल पाटील यांनी पुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे नियोजन केले व फुकटचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. खासदार डॉ. भामरे यांनी सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेची महिती दिली.

या योजनेचे काम प्रगतिपथावर असून, २०२४ पर्यंत शिंदखेडा व धुळे या दोन तालुक्यांचा सिंचनाचा अनुशेष भरून निघणार असल्याचे त्यांनी सांगितले. यानिमित्ताने एकाच पुलाचे दोन वेळा भूमिपूजन झाल्याने नागिरकांत मात्र त्याची चर्चा रंगली. यानिमित्ताने काँग्रेस व भाजपचा राजकीय संघर्ष टोकाला जाणार की काय अशी स्थिती आहे. त्याचा आगामी निवडणुकांवर काय परिणाम होतो याची देखील उत्सुकता आहे.

या भुमिपूजन कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती प्रा. अरविंद जाधव, रामकृष्ण खलाणे, विद्यमान कृषी सभापती संग्राम पाटील, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब देसले, किशोर संघवी, धुळे पंचायत समितीचे उपसभापती विद्याधर पाटील, शिरूडचे माजी सरपंच विजय पाटील आदी प्रमुख पाहुणे होते.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com