

Maharashtra Public Service Commission : विद्यार्थी संघटनेच्या आंदोलनाच्या रेट्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (MPSC) अध्यक्ष विवेक भीमनवार हे सक्तीच्या रजेवर गेले.
अहिल्यानगरमधून पेपरफुटीची तक्रार करणारा ऋषिकेश गांगर्डे यांनी, ते सक्तीच्या रजेवर गेले नसून, ते स्वतः रजेवर गेले आहेत. ते पुन्हा दोन महिन्यानंतर येतील. विद्यार्थ्यांचे आंदोलन हे त्यांच्या राजीनाम्यासाठी होते. त्यांचा राजीनामा होईपर्यंत हे आंदोलन थांबवायला नको होते. आंदोलन रजेसाठी नाही, अशी स्पष्ट भूमिका मांडली.
ऋषिकेश गांगर्डे म्हणाले, "विवेक भीमनवार हे स्वतःहून रजेवर गेले आहे. त्यांचे निलंबन गरजेचे होते. पण ते रजेवर असले, तरी ते हस्तक्षेप करू शकतात. चौकशी समितीचे सचिव तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) आहेत. या चौकशी समितीत इतर सदस्य देखील आहेत." पण भीमनवार हे रजेवर आहेत. ते दोन महिन्यानंतर पुन्हा रजेवरून येतील. त्यामुळे आयोगातील इतर सदस्य किंवा अधिकारी चौकशी समितीला कितपत सहकार्य करतील, असा प्रश्न ऋषिकेश गांगर्डे यांनी उपस्थित केला.
भीमनवार हे पेपरफुटीतील आरोपी नाहीत. पण ते पेपरफुटी देखील रोखू शकले नाहीत. चौकशी समिती देखील भीमनवार यांच्या बाजून अहवाल देत, क्लिन चीट देतील. आंदोलनाबाबत दोन दिवसांत विद्यार्थ्यांशी (Student) बोलून, विद्यार्थ्यांची संघटना उभी करून दोन दिवसांत निर्णय जाहीर करणार असल्याचे ऋषिकेश गांगर्डे यांनी म्हटले.
औषध निरीक्षक पदाचा पेपरफुटीनंतर, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभाराबाबत, विशेष करून आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या कार्यपद्धतीवर विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवत राजीनाम्याची मागणी लावून धरली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनात फूट पडून तीन वेगवेगळी आंदोलने झाले. परंतु विवेकानंद पाटील या विद्यार्थ्याने आंदोलन पुढे रेटले अन् त्याने राजीनाम्याशिवाय माघार नाही, अशी भूमिका घेतली.
या आंदोलनाला सत्ताधारी विरोधी राजकीय नेत्यांचे पाठबळ मिळाले. विद्यार्थी देखील मागे हटले नाही. सत्ताधारी भाजपकडून विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर टीकेचा भडिमार झाला. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना 'अर्बन नक्षल' म्हटले गेले. तरी विद्यार्थ्यांनी आंदोलन पुढे रेटले. आंदोलनाच्या 11 व्या दिवशी विवेक भीमनवार यांनी रजेवर जात असल्याचे जाहीर करताच, विद्यार्थ्यांनी जल्लोष केला.
औषध निरीक्षक पेपरफुटीची तक्रार करणारा ऋषिकेश गांगर्डे यांनी, विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करण्याच्या विचारावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करत, नाराजी व्यक्त केली. आयोगाचे अध्यक्ष भीमनवार यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन सुरू होतं. त्यांचा राजीनामा होईपर्यंत हे आंदोलन थांबवायला नको होतं. आंदोलनात राजकीय हस्तक्षेप झाला. परंतु दोन दिवसांमध्ये विद्यार्थ्यांसोबत बोलून पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचे गांगर्डे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.