MLA Nilesh Lanke : खासदार विखेंच्या माफीनाम्यावर आमदार लंकेंनी फुंकली तिखट हवा

Nagar South Lok Sabha Constituency: भाजपच्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या पूर्व आढावा बैठकीत खासदार विखेंच्या माफीनाम्यावर आमदार लंकेंनी केली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Sujay Vikhe, Nilesh Lanke
Sujay Vikhe, Nilesh LankeSarkarnama
Published on
Updated on

Nagar South Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीच्या मैदानात आहे की नाही, हे अस्पष्ट असतानाच राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी भाजप खासदार सुजय विखे यांच्या कालच्या माफीनाम्यावर तिखट हवा फुंकली आहे. त्यांचा माफीनाम्यात राजकीय स्वार्थ आहे, अशी बोचरी टीका आमदार लंके यांनी केली आहे.

भाजपने सोमवारी (ता.18) नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या पूर्व नियोजन आढावा बैठक झाली. या बैठकीत खासदार सुजय विखे (Sujay Vikhe Patil) यांनी भाषणात माफीनामा सादर केला. कुणी दुखावले गेले असतील, तर त्यांची माफी मागतो. मी माझा परिवार, आई-वडील, मुलांना स्मरून माफी मागतो. परंतु आता हे सर्व मागे ठेवून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी एकत्र लढायाचे आहे, असे आवाहन केले.

Sujay Vikhe, Nilesh Lanke
Sharad Pawar Vs Ajit Pawar : 'तुतारी' देशभर वाजणार, पण 'घड्याळा'ची धाकधूक; सुप्रीम कोर्टात काय घडलं?

खासदार विखेंनी कालच्या आढावा बैठकीत भाषण करताना तीनदा माफी मागितली. खासदार विखेंनी माफीनामा सादर केल्यानंतर लगेच त्यांचे वडील पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी भाजप नेते आमदार प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांची त्याच्या निवासस्थानी भेट घेतली. या दोघांमध्ये बंद दाराआड दीड तास चर्चा झाली. भाजपमधील या राजकीय उलथापालथीनंतर आणि खासदार विखेंच्या माफीनाम्यावर आमदार लंके यांनी तिखट हवा फुंकली आहे.

आमदार लंके म्हणाले, जिल्ह्यात स्वयंभू नेता म्हणून वावरत असलेल्या नेत्याने काल माफीनामा सादर केला. पाच वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत, संघटना तसेच सामाजिक जीवनात काही चुका झाल्या असतील तर मी जाहीर माफी मागतो, असे त्यांनी म्हटले. पण, मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही पाच वर्षात ज्या चुका केल्या, त्यावर पाच वर्षानंतर माफी मागण्याची वेळ का आली? सत्तेचा फायदा सर्वसामान्य लोकांसाठी झाला पाहिजे.

संघटनेतील पदाधिकारी सामाजिक ताकद वाढवण्यासाठी सत्तेचा फायदा करून दिला पाहिजे. आज माफी मागत आहात. याचा अर्थ स्वतःचा राजकीय स्वार्थ भागल्यानंतर, परत तुम्ही कार्यकर्त्यांना चिरडवणार आहात. ही माफी फक्त स्वतःसाठी आहे. आपला स्वार्थ भागल्यानंतर परत हे बदला घेतल्याशिवाय सोडत नसतात. आता तरी शहाणं व्हावे, असेही आमदार लंके म्हटले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार लंके यांनी शरद पवार यांची भेट घेण्यापूर्वी ते राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली होती. या भेटी दरम्यान त्यांनी मंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार सुजय विखे यांच्याविषयी तक्रार केल्याचे समजते. यावर वरिष्ठ पातळीवर तोडगा न निघाल्याने आमदार लंके हे विखे यांच्या विरोधातील भूमिकेवर ठाम आहेत. लंके-विखे यांचे हे द्वंत आता लोकसभेच्या निमित्ताने नगर दक्षिणमध्ये दिसणार आहे.

आमदार नीलेश लंकेंनी (Nilesh Lanke) खासदार विखेंच्या माफीनाम्यावर काही तासाच प्रतिक्रिया दिल्याने, या दोघांमध्ये नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात द्वंद रंगणार असे दिसते आहे. आमदार लंके यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर झालेल्या जाहीर कार्यक्रमात हातात तुतारी देखील घेतली आहे.

परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशाबाबत अधिकृत असे जाहीर केलेले नाही. असे असले, तरी महाविकास आघाडीतील इतर घटक पक्ष नगर दक्षिण उमेदवारीबाबत चुप्पी साधून आहे. यामुळे शरद पवारांकडून नगर दक्षिणेचा उमेदवार निश्चित झाल्याचे दिसते.

Sujay Vikhe, Nilesh Lanke
Pune Lok Sabha News 2024 : मोठी बातमी! पुण्यातून शरद पवार लढणार, कार्यकर्त्यांचा हट्ट पुरवणार का?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com