Nagar Lok Sabha : नगर दक्षिणची निवडणूक विखे कोर्टात घेऊन जाणार? राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा दावा

Lok Sabha Election 2024 : या निवडणुकीत प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या बाजूने झुकलेले दिसले. ईव्हीएम मशीनवरील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवाराच्या नावाची पट्टी फिकट रंगात होती.
Sujay Vikhe-Nilesh Lanke
Sujay Vikhe-Nilesh LankeSarkarnama

Nagar, 14 May : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील निवडणूक न्यायालयात जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंकेंना बदनामीची नोटिस बजावण्यात आली. या नोटिसला अवघ्या चार तासांत उत्तर मागवण्यात आले. हा नोटिस बजावण्याच्या खेळ सोमवारी मतदानाच्या दिवशी झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पक्षाचे नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी सांगितले.

महायुती भाजपचे उमेदवार खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्यामार्फत नोटिस बजावली होती. मतदानाच्या दिवशीच दुपारी 12 वाजता ही नोटिस बजावली गेली. या नोटिसवर अवघ्या चार तासांत उत्तर मागितले गेले. या नोटिसला पुराव्यानिशी उत्तर दिले गेले असून, विखे यांनी ही निवडणूक कायद्यानुसार न्यायालयात नेणार असल्याचे संकेत मिळाल्याचा दावा जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sujay Vikhe-Nilesh Lanke
Loksabha Election Voting : अहमदनगरमध्ये सरासरी 61 टक्के तर शिर्डीत 59 टक्के मतदान!

नीलेश लंकेंनी (Nilesh Lanke) एका सभेदरम्यान एक पाकीट दाखवले होते. समोरचे उमेदवार अशी पाकिटे वाटत आहेत. हे ज्यांना दिले, त्यांनी जसेच्या तसे आपल्याला आणून दिले, असे सांगून भरसभेत हे पाकीट खोलून दाखवले. बघा हे लक्ष्मीदर्शन, असे म्हणत ही निवडणूक धनशक्तीविरोधात जनशक्ती असल्याचा दावा, नीलेश लंकेंनी केला होता. या प्रकाराशी आपला काही संबंध नसताना नीलेश लंकेंनी आपली बदनामी केल्याचा आरोप करत मतदानाच्या दिवशी लंकेंना नोटिस बजावून अवघ्या चार तासांत उत्तर मागितले. विखे यांच्या या कृतीने ही निवडणूक न्यायालयात जाणार, असेच संकेत आहेत. त्यांनी तशी तयारी केल्याचे दिसते आहे, असे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी म्हटले.

राजेंद्र फाळके यांनी या निवडणुकीत प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या बाजूने झुकलेले दिसले, असा गंभीर आरोप केला. ईव्हीएम मशीनवरील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराच्या नावाची पट्टी फिकट रंगात होती. चिन्ह फिकट दिसत होते. तुलनेत विरोधक उमेदवाराच्या नावाची पट्टी गडद, ठळक अशी होती.

याशिवाय काही संवेदनशील मतदान केंद्र सांगण्यात आली होती. बनपिंप्री (श्रीगोंदे), बुऱ्हाणनगर (ता. नगर) यासह नगर शहरातील पाच केंद्राचा समावेश होता. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांना पत्र दिले होते. या केंद्रावर आतमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी केली होती. तिथे तशी कार्यवाही केली नाही, असेही राजेंद्र फाळके यांनी सांगितले.

Sujay Vikhe-Nilesh Lanke
Sarkarnama Exclusive : मुरलीधर मोहोळांचा गेम करून धंगेकरांना ‘नाना’ तऱ्हेने सेफ करणारा नेता कोण?

श्रीगोंद्यातील बनपिंप्री येथे सोमवारी दुपारी बूथ ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला. शाई लावली जायची आणि मतदाराला मतदान करू दिले जात नव्हतं. याबाबत निवडणूक अधिकारी यांना पत्र देऊन घटनेची माहिती दिली. सीसीटीव्हीचे चित्रीकरण आम्ही मागितले आहे. या बूथवर पुन्हा मतदान घ्या, अशी मागणी होती.

नगर दक्षिण मतदारसंघातील कोणत्याही हालचालीवर आमची बारकाईने नजर होती. ग्रामीण भागात धनलक्ष्मीचे दर्शन दाखवले गेले. दमदाटी, दहशतीचे प्रकारही झाले. तसेच, समाज माध्यमांवरून संभ्रम निर्माण करण्याचा प्रकार झाला. त्यालाही उत्तर देत मतदारांचे संभ्रम दूर केले. मतदार आमच्याबरोबर आहेत. धनशक्तीवर जनशक्ती भारी पडणार आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात जनशक्तीचा विजय पक्का आहे, असा दावा राजेंद्र फाळके यांनी केला.

Edited By : Vijay Dudhale

Sujay Vikhe-Nilesh Lanke
Anna Hazare News : नगर दक्षिणमध्ये पैशाचे वाटप? अण्णा हजारे म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com