Nashik Loksabha Election : 'हो, दिल्लीला गेलो पण..' ; लोकसभेसाठी इच्छुक असणाऱ्या 'ठाकरें'चं विधान!

Nitin Thackeray BJP Nashik : नाशिक लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे जाण्याची चिन्हे आहेत
Nitin Thackeray
Nitin ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार फिल्डींग लावण्याचे काम इच्छुक उमेदवारांकडून सुरू आहे. वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी असो की विरोधकांच्या हालचाली याकडे सर्वांचे लक्ष असते. भाजपाकडून नाशिक लोकसभेसाठी इच्छुक असलेले अ‍ॅड. नितीन ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याचीही अशीच चर्चा सुरू झाली. मात्र, हो दिल्लीला गेलो होतो, पण ते काम राजकीय नव्हते, असा दावा करीत दिल्लीत भाजपाच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्यांशी संपर्क करण्याचा प्रश्नच उद्भवला नसल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

नाशिक लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे जाण्याची चिन्हे आहेत. त्यादृष्टीने अनेक इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. भाजपाकडून लढण्यासाठी अनेक नवे-जुने नेते तयार असून, तिकीट मिळवण्यासाठी सगळ्यांचेच प्रयत्न सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी अ‍ॅड. नितीन ठाकरे यांच्या समर्थकांनी मोठा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात सर्वांनीच नितीन ठाकरे(Nitin Thackeray) यांना पाठिंबा दर्शवत लाखो रूपयांचा निवडणूक निधीही संकलीत केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nitin Thackeray
Radhakrishna Vikhe Patil : काँग्रेसचे काही नेते रात्री...; विखे-पाटलांचा धक्कादायक आरोप

अ‍ॅड. ठाकरे हे नाशिक वकील संघाचे तसेच राज्यातील सर्वात मोठ्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष आहेत. मराठा समाजाचा त्यांना मोठा पाठिंबा असल्याचे संस्थेच्या निवडणुकीवेळी दिसूनही आले. आता ठाकरे लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत.

मात्र भाजपाकडून(BJP) अद्याप कोणत्याही उमेदवारावर शिक्कामोर्तब झालेला नाही. त्यातच अ‍ॅड. ठाकरे दिल्लीत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. याबाबत सरकारनामा प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी दिल्लीला जाऊन आल्याचे स्पष्ट केले. याबाबत बोलताना ठाकरे म्हणाले की, ‘हो मी दिल्लीत गेलो होतो. 25 फेब्रुवारी रोजी नाशिकमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन होणार असून, त्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या न्यायमुर्तींना निमंत्रण द्यायचे होते. ती निमंत्रणं दिल्यानंतर मी तत्काळ नाशिकला परतलो. तिथे राजकीय गाठीभेटी झाल्या नाहीत.'

Nitin Thackeray
MP Hemant Godse : मोठी बातमी ! खासदार हेमंत गोडसेंच्या गाडीचा अपघात; बालंबाल बचावले...

याशिवाय 'मी भाजपकडून उमेदवारी मागितली आहे. उमेदवार निवडण्याची भाजपाची एक पद्धत आहे. त्यासाठी सर्वे आणि इतर अनेक बाबी महत्वाच्या असतात. उमेदवारी मिळाली तर माझी तयारी आहे’, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, नाशिक लोकसभा मतदार संघ सध्या शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात आहे. शिवसेनेला(Shivsena) बाजुला करून तिथे भाजपा आपला हक्क प्रस्थापीत करणार असल्याने ही लढत अत्यंत अटीतटीची होईल, असा अंदाज वर्तावला जातो आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com