Nashik APMC Politics : नाशिक बाजार समितीवर राष्ट्रवादीला डावलले, थेट सुनेत्रा पवारांकडे तक्रार जाणार?

NCP Excluded From Nashik APMC Board : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर शासनाने चार सदस्यीय अशासकीय प्रशासक मंडळ नेमलं आहे. यात तीन भाजपचे तर एक सदस्य शिवसेनेचा आहे. मात्र, राष्ट्रवादीला डावलण्यात आल्याने पक्षात नाराजी पसरली आहे.
Nashik APMC Politics
Nashik APMC PoliticsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Nashik APMC News : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विभाजनानंतर विद्यमान संचालक मंडळ बरखास्त झाल्याने आगामी निवडणुकीच्या तयारीला वेग येण्याची अपेक्षा असतानाच मोठा ट्विस्ट निर्माण झाला. शासनाने बाजार समितीवर चार सदस्यीय अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त केले आहे.

यात स्थायी समितीचे माजी सभापती व मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असलेल्या गणेश गिते यांची मंडळाच्या अध्यक्षपदी तर माजी आमदार बाळासाहेब सानप, बापू पिंगळे आणि सचिन ढिकले यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यात गिते, सानप आणि पिंगळे हे भाजपचे असून ढिकले हे शिंदे यांच्या शिवसेनेचे आहेत. त्यामुळे या नियुक्तीत भाजपच्या तिघांना तर शिंदेच्या शिवसेनेतील एकाला संधी मिळाली आहे. मात्र यात राष्ट्रवादीला डावलले आहे.

राज्यात भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षाचे महायुती सरकार आहे. नाशिक बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्ती करताना भाजपचे तीन, शिवसेनेचा एक सदस्य नियुक्त करण्यात आला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसला डावलण्यात आल्याने राष्ट्रवादीच्या गोटात आता नाराजी पसरली आहे.

Nashik APMC Politics
Nashik APMC : नाशिक बाजार समितीच्या विभाजनानंतर नवी खेळी; अध्यक्षपदी भाजपचे गणेश गिते यांची नियुक्ती

बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्तीची राष्ट्रवादीला कल्पनाही दिली गेली नाही व डावलण्यात आल्याने याविरोधात राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे याबाबत तक्रार करणार असल्याचे समजते आहे. यामुळे स्थानिक पातळीवर महायुतीच्या तीन्ही घटक पक्षात सर्व काही आलबेल नसल्याचे दिसत आहे.

सध्या राज्याचा सहकार विभाग हा राष्ट्रवादीकडे आहे. तर माजी खासदार देविदास पिंगळे यांच्या रूपाने अनेक वर्षे बाजार समितीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे प्रशासक मंडळात राष्ट्रवादीला स्थान मिळण्याची अपेक्षा होती. परंतु पणन विभाग आपल्याकडे असलेल्या भाजपने राष्ट्रवादीला डावलत शिंदे यांच्या शिवसेनेला संधी दिली आहे. त्यामुळे याविरोधात राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांकडून सुनेत्रा पवार यांच्याकडे तक्रार केली जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी काळात यावरुन नाशिकच्या राजकारणात पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

Nashik APMC Politics
Ganesh Gite : सलग तीन वेळा धक्के खाल्ले, अखेर गणेश गितेंचं राजकीय पुनर्वसन झालं, कुणाची कृपा?

37 वर्षांनंतर पुन्हा प्रशासक मंडळ
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात तब्बल ३७ वर्षांनंतर पुन्हा प्रशासक मंडळ नियुक्त झाले आहे. यापूर्वी 1989-90 च्या सुमारास प्रशासक मंडळाची नियुक्ती झाली होती. त्या वेळी पोपटराव पिंगळे यांनी अध्यक्ष म्हणून सुमारे दीड वर्ष काम पाहिले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com