Rahul Narvekar News: विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी सध्याच्या राजकारणावर कटाक्ष केला आहे. सध्या सरकार विकासाच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबवत आहेत. निश्चितच त्यातून चांगले काहीतरी बाहेर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सध्याच्या राजकारणावर विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले जगभर सध्या राजकीय नेत्यांकडे आणि राजकारणाकडे पाहण्याची दृष्टी स्वार्थी झाली आहे. त्याचा परिणाम राजकारण्यांच्या प्रतिमेवर झाला आहे. ही प्रतिमा मलीन झालेली आहे.
लोकांची राजकारणाकडे पाहण्याची धारणा बदलण्याची गरज आहे. त्यासाठी समाज आणि जागरूक नागरिक महत्त्वाचा घटक आहे. या जागरूकतेतून निश्चितच राजकारण व सरकार याकडे पाहण्याची दृष्टी चांगली होईल, असे त्यांनी नाशिक येथे झालेल्या एका कार्यक्रमात सांगितले.
सध्या डिजिटल माध्यमांचे युग आहे. माध्यमांतून हवी ती माहिती सहज आणि गतीने मिळते. मात्र त्या माहितीचा आधार आणि उपयोग कसा व्हावा, हे प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. समाजाचा हा दृष्टिकोन विकसित करण्याची गरज आहे.
समाज घडवायचा असेल तर चांगले विचार युवकांमध्ये आणि नागरिकांमध्ये रुजवावे लागतील. त्यात वाचनालयांची भूमिका महत्त्वाची आहे. वाचनालय टिकली तर समाज नक्कीच प्रगल्भ होईल. समाजात विचार जिवंत राहतात.
सरकारकडे समाज आणि व्यवस्थेत सुधारणेसाठी अनेक कामे सुरू आहे. भारत हा जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. ही व्यवस्था सक्षम आणि विकसित करण्यासाठी चीन आणि अमेरिका यापेक्षाही अधिक तरुण असलेल्या भारताला मोठी संधी आहे.
त्यात अग्रस्थानी राहायचे असेल तर कुशल आणि सक्षम तरुण घडविण्याची गरज आहे. यामध्ये सगळ्यांनाच योगदान द्यावे लागेल. सरकार त्या दिशेने काम करीत असून 2047 पर्यंत आपला देश विकसित राष्ट्र होईल, हे भाजपचे व्हिजन त्यांनी सांगितले.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.