Narwekar On Viral Video : व्हायरल व्हिडिओबाबत राहुल नार्वेकरांचा खुलासा; ‘मी शांतपणे वाद मिटविण्याचा सल्ला दिला; त्यानंतर...’

Rahul Narwekar VS Sanjay Raut : अलिबाग येथील व्हायरल व्हिडिओवरून राहुल नार्वेकर यांनी स्पष्टीकरण दिले. संजय राऊत यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमुळे राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली असून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
Rahul Narwekar
Rahul Narwekar Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 14 February : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा अलिबाग येथील एक व्हिडिओ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत व्हायरल केला होता. तो सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्याची राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा होत असताना त्यावर खुद्द ॲड राहुल नार्वेकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला आहे! तुम्ही सांगताय की मी सांगू? असे सवाल उपस्थित केले होते. त्यांनी व्हायरल केलेल्या व्हिडिओमुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही ॲड नार्वेकर यांच्या आरोप केले होते. अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावात स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) हे दादागिरी करून शेतात मोजणी करण्याचे काम करत होते. स्थानिक शेतकऱ्यांनी केलेल्या विरोधामुळे नार्वेकर यांना अक्षरशः पळ काढावा लागला, असा दावा सपकाळ यांनी केला होता.

Rahul Narwekar
BJP News : भाजप आमदाराची निवडणूक आयोगात तक्रार देणाऱ्या बंडखोराच्या गाडीला अपघात; गंभीर जखमी नेत्यावर सोलापुरात उपचार

दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, आज सोशल मीडियावर माझ्याबाबत प्रसारित होत असलेल्या व्हिडिओ संदर्भात मी सत्य परिस्थिती स्पष्ट करू इच्छितो. मी परवा माझ्या शेतजमिनीवर जात असताना रस्त्यावर दोन शेतकऱ्यांमध्ये वाद होत असल्याचे माझ्या निदर्शनास आले. त्यावेळी मी फक्त त्यांना शांतपणे वाद मिटवण्याचा सल्ला दिला आणि त्यानंतर माझ्या कामानिमित्त पुढे निघून गेलो.

Rahul Narwekar
Rahul Narvekar viral Video : नार्वेकरांनी पळ का काढला?; तुम्ही सांगताय की मी सांगू?; विधानसभा अध्यक्षांचा व्हिडिओ व्हायरल करत संजय राऊतांचा सवाल

सदर वाद किंवा त्या घटनेशी माझा कोणताही संबंध नाही. त्यामुळे विनाकारण माझे नाव त्या घटनेशी जोडू नये, ही नम्र विनंती, असे आवाहन ॲड नार्वेकर यांनी आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून केले आहे, त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या व्हिडिओबाबत नार्वेकरांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com