Nashik Politics : भाजपचे जेष्ठ नेते सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर आणि नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यात नाशिक महापालिका निवडणुकी दरम्यान झालेला वाद नाशिकमध्ये चर्चेचा विषय बनला होता.
सिडकोतील प्रभाग २९ मध्ये भाजपचे उमेदवार मुकेश शहाणे यांच्या जागेवर दोन एबी फॉर्म देण्यात आले होते. त्यात शहाणे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला होता. तर, सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर यांचा अर्ज पात्र ठरला होता. त्यानंतर राजकीय वादाचा मोठा भडका उडाला होता.
शहाणे यांनी बंड पुकारत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत दीपक बडगुजर यांच्याविरोधात निवडणूक लढवत त्यांचा पराभव केला होता. या लढतीची व त्यावेळी झालेल्या वादाची मोठी चर्चा शहरात होती. कालांतराने हा वाद शांत झाला असताना आता पुन्हा या दोन कट्टर विरोधकांमधील वादाने पेट घेतल्याचं दिसत आहे.
त्याचे झाले असे की, १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त महालक्ष्मी चौक येथे आयोजित सभेत बोलताना नगरसेवक मुकेश शहाणे यांनी सुधाकर बडगुजर यांच्यावर नाव न घेता टीका केली. “सलीम कुत्तासोबत नाचणारा कुत्ता आता भगव्याखाली आला असून उद्या हिंदूंचा घात करेल" , अशी टीका शहाणे यांनी केली. या वक्तव्यावर सुधाकर बडगुजर यांनी थेट प्रतिक्रिया दिली नसली तरी बडगुजर यांच्या समर्थकांनी मात्र सोशल मीडियावर यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर यांनी फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करुन शहाणे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. दीपक बडगुजर यांनी व्हिडिओ पोस्ट करत, "१४ मे रोजी महालक्ष्मी चौकात झालेल्या एका कार्यक्रमात सिडकोतील एक मोकाट कुत्र आमच्या आदरणीय सुधाकर बडगुजर यांच्याविषयी काहीतरी भुंकून गेलं.
मुळात त्या कुत्र्याला हे माहिती नाही की, तो ज्या केसविषयी बोलतोय त्या केसविषयी पोलिसांनी यापूर्वीच कुठलेही पुरावे आढळले नसल्याचा अहवाल सादर केला आहे. हे माहित नसेल तर जरा माहित घेऊन आरोप प्रत्यारोप करावे" असा टोला दीपक बडगुजर यांनी शहाणे यांना नाव न घेता लगावला.
दुसरीकडे, ज्याचा मागील काळात कायद्याचा बालेकिल्ला झाला अशा लोकांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. माझी पोलिस प्रशासनाला विनंती आहे की, ज्यांनी वर्षानुवर्ष जेलमध्ये काढले आहेत, अशा गुंडांना घेऊन जो लोकप्रतिनिधी फिरतो त्याच्यावर पोलिसांनी कारवाई करावी असे आवाहन दीपक बडगुजर यांनी पोलिसांना व्हिडीओतून केलं आहे.
दरम्यान भाजप नगरसेविका साधना पवन मटाले यांनीही फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करत शहाणे यांच्यावर नाव न घेता टीका केली. गुंड प्रवृत्तीच्या लोकप्रतिनिधीने आपल्या तोंडावर आवर घालावा. काहीही संबध नसताना आमचे नेते सुधाकर बडगुजर यांचे नाव घेऊन राजकारण करण्याचा प्रयत्न केला. सिडकोतील वातावरण खराब करण्याचे काम त्यांच्यामार्फत सुरू असून पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.