Loksabha Politics: भाजप-शिंदे गटात जुंपली; जळगाव मतदारसंघासाठी भाजप नेत्यांनी सुनावले खडेबोल

BJP, Shivsena Politics : महायुतीतील वातावरण दूषित करू नका, भाजप नेत्यांनी शिंदे गटाच्या अतिउत्साही पदाधिकाऱ्यांना सुनावले.
BJP, Shivsena Politics
BJP, Shivsena Politics Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News : 'तुम्हाला लोकसभा निवडणूक लढवायची तर जरूर लढा, मतदारसंघ मागायचा तर तो देखील जरूर मागा. मात्र, तुमच्या नेत्यांकडे मागा. जाहीर वक्तव्य करून वातावरण कशाला बिघडवता', असे खडे बोल भाजप नेत्यांनी शिंदे गटाच्या अतिउत्साही पदाधिकाऱ्यांना सुनावले आहे.

निवडणूक जाहीर होण्याआधीच 'महायुती'च्या नेत्यांमध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघ कोणाचा यावरून सध्या वाद सुरू झाला आहे. शिंदे गटाच्या नेत्यांनी नुकतेच भाजपचे खासदार उन्मेष पाटील सर्व्हेमध्ये पिछाडीवर आहेत, असा दावा करून जळगाव मतदारसंघात शिंदे गटाकडून उमेदवार दिला जाईल, असे सांगितले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

BJP, Shivsena Politics
Nashik Politics: बडगुजरांवरील कारवाईनंतर मोठ्या घडामोडी; भाजपच्या माजी नगरसेवकाला पोलिस संरक्षण

या पार्श्वभूमीवर, भाजपचे जळगाव क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर जळकेकर महाराज यांनी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख नीलेश पाटील यांना चांगलेच सुनावले आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांसाठी तो चर्चेचा विषय ठरत आहे. यासंदर्भात जळकेकर म्हणाले, 'महायुतीत असलेल्या घटक पक्षांना मतदारसंघांवर दावा करण्याचा हक्क आहे. परंतु त्यांनी तो त्यांच्या पक्षांच्या नेत्यांकडे करावा, उगाच त्याची जाहीर वाच्यता करू नये. महायुतीत असलेल्या नेत्यांचे चांगले संबंध बिघडवू नये'.

'उमेदवारीबाबत दोन्ही पक्षाचे कोअर कमिटीचे सदस्य निर्णय घेतील. त्यामुळे चुकीचे वक्तव्य करून उगीच वातावरण दूषित करू नये', असा सल्ला त्यांनी दिला आहे. महायुतीतील पक्षांनी दावा करण्यास आपलीच काहीच हरकत नाही. परंतु, सर्व्हेत भाजप पिछाडीवर आहे, असे म्हणणे साफ चुकीचे आहे. कोणी सर्व्हे केला, त्याची संपूर्ण माहितीच त्यांनी द्यावी, असे आव्हानही त्यांनी पाटलांना दिले.

'जळगाव लोकसभेच्या दाव्याबाबत सांगावयाचे झाल्यास ही जागा परंपरागत भारतीय जनता पक्षाची आहे आणि पक्षाची ताकद किती आहे, हे चित्र तर समोरच दिसून येत आहे. ते ज्या पारोळा, पाचोरा मतदारसंघाचा दावा करीत आहेत, त्या मतदारसंघातून आमचे खासदार तब्बल 70 ते 75 हजार मताधिक्याने निवडून आले आहेत".

(Edited by- Ganesh Thombare)

BJP, Shivsena Politics
Viksit Bharat Sankalp Yatra: 'मोदी सरकार खोडा अन् मगच गावात या...'; साताऱ्यात 'संकल्प रथ'च रोखला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com