

Nashik News, 14 Apr : महिला अत्याचार आणि फसवणुकीच्या घटनांमुळे नाशिक चर्चेत आहे. त्यात काल आणखी एका धक्कादायक प्रकारची भर पडली. त्यामुळे नाशिक पुन्हा हादरलं आहे. गेल्या दोन आठवड्यात भोंदू अशोक खरातच्या महिला अत्याचाराच्या घटनांनी नाशिक चर्चेत आले.
पत्रकार म्हणवणाऱ्या व्यक्तीकडून असाच प्रकार घडला. त्यामुळे नाशिक शहर वादात सापडले आहे. सोमवारी सायंकाळी यामध्ये धक्कादायक प्रकाराची भर पडली. एका महिलेने परिचिताला महामार्गाजवळ बोलावून डोळ्यात मिरचीची पूड टाकली. दगडाने ठेचले. त्यानंतर कोयत्याने सपासप वार करीत ठार करण्याचा प्रयत्न केला.
या घटनेत संबंधित महिलेचा परिचित सुरज सोळंकी (वय ३७) गंभीर रित्या जखमी झाला. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. यासंदर्भात नाशिक ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संबंधित महिला एका व्यक्ती समवेत मोटरसायकलवर घटनास्थळी आली होती. तिने ओढणीने आपले तोंड पूर्णपणे झाकले होते. मोटर सायकलच्या नंबर प्लेटवर देखील ओढणी लावून ती झाकली होती.
संबंधित महिलेने सोळंकी यास साडेतीन वाजता फोन करून बोलवले होते. यावेळी सोळंकी याने फोनवर तुला बघून घेतो असे म्हणत घाईने दुचाकी वर निघून गेला. त्यानंतर त्याचा फोन स्विच ऑफ झाला. एका महिलेने एवढ्या क्रूरपणे हत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे नाशिक हादरले. रोज होणाऱ्या घटनांमध्ये आणखी एक भर पडली. यावेळी महिला अत्याचाराने चर्चेत असलेल्या नाशिकमध्ये महिलेनेच क्रूर हत्येचा प्रयत्न केला.
ही घटना घडली तेव्हा महामार्गावरून जाणारे संजय मोहिते या जागरूक नागरिकांनी गाडी थांबून घटनेचे फोनमध्ये चित्रीकरण केले. त्यानंतर तातडीने विल्होळी येथील पोलीस पाटलांशी संपर्क देखील केला. दुचाकीचा पाठलाग करण्याचाही प्रयत्न केला. ही दुचाकी मुंबईच्या दिशेने निघून गेली होती.
या घटनेत हल्ला झालेला सुरज सोळंकी याच्या दुचाकी वर 'औरत की इज्जत करो, औरत पर भरोसा मत करो' असे लिहिलेले आहे. फोनवर बोलताना तो संबंधित विषयी जेनी असा उल्लेख करत होता. त्याच्या कुटुंबीयांनी ही माहिती दिली. हल्ला झालेला सोळंकी हा मुळचा अहमदाबाद येथील आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.