Shiv Sena Politics : राज, राणे, भुजबळ तिघेही शिवसेनेत परत येणार होते ; पण रश्मी ठाकरेंनी खोडा घातला..शिंदेंच्या नेत्याने फोडला नवा बॉम्ब

Bharat Gogawale claims Raj Thackeray, Narayan Rane, Chhagan Bhujbal were ready to return to Shiv Sena but Rashmi Thackeray blocked it : भाजपमध्ये जाण्याआधी नारायण राणे पुन्हा शिवसेनेत येणार होते. तसेच छगन भुजबळ देखील पुन्हा शिवसेनेत येणार होते. राज ठाकरेही येणार होते. पण रश्मी ठाकरे यांनी त्यात खोडा घातल्याचा गौप्यस्फोट शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने केला आहे.
Raj Thackeray,Narayan Rane, Chhagan Bhujbal, Rashmi Thackeray
Raj Thackeray, Narayan Rane, Chhagan Bhujbal, Rashmi ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Bharat Gogawale statement : भाजपमध्ये जाण्याआधी नारायण राणे पुन्हा शिवसेनेत येणार होते. तसेच छगन भुजबळ देखील पुन्हा शिवसेनेत येणार होते. पक्षात तशी चर्चा चालू होती. कोकणात राणे यांची ताकद होती, वेगळं वलय होतं. त्यामुळे आपणही राणेंना पक्षात घ्या असं सांगितलं होतं. परंतु उद्धव ठाकरेंनी आमचं ऐकलं नाही. उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंच ऐकलं त्यामुळे हे सर्व रखडलं असा आरोप गोगावले यांनी केला आहे.

एका खाजगी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गोगावले यांनी हा गौप्यस्फोट केला. गोगावले यांना ठाकरे बंधू एकत्र येतील का असं प्रश्न केला गेला. त्यावर गोगावले म्हणाले आत्ताची स्थिती पाहता दोघे एकत्र येतील असं वाटत नाही. कारण की ज्यावेळेला खरोखर संधी होती त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी ती गमावली. त्यांनी अनेक संधी गमावल्या. कारण त्यावेळेला नारायण राणे आमच्या जवळ येत होते. भुजबळ साहेब पण येत होते. पण उद्धव ठाकरेंनी ऐकलं नाही, कुणाचं ऐकलं ते समजून घ्या असं म्हणत त्यांनी रश्मी ठाकरेंवर निशाणा साधला.

उद्धव ठाकरे आजारी असताना राज ठाकरे तर स्वत:गाडी चालवत त्यांना लिलावतीला घेऊन गेले परत आणूनही सोडलं. राज ठाकरे शिवसेनेत येत होते मग रश्मी ठाकरेंनी खोडा घातला का असा सवाल केला असता गोगावले म्हणाले शंभर टक्के. यापूर्वीच दोन्ही भाऊ एकत्र येणार होते मात्र त्यात रश्मी ठाकरेंनी खोडा घातला. त्यावेळेला जर दोन्ही भाऊ एकत्र आले असते तर नारायण राणे आमच्या जवळ आले असते. नंतर भुजबळ साहेब पण यायच्या तयारीत होते. या सगळ्या घडामोडी पाहाता तसे झाले असते तर आज शिवसेना कुठल्या कुठे असती असं गोगावले म्हणाले.

Raj Thackeray,Narayan Rane, Chhagan Bhujbal, Rashmi Thackeray
Chhagan Bhujbal : 'मला शिकवू नका, मी मुंबई महापालिका सांभाळली आहे'..भुजबळांनी अधिकाऱ्यांना धू धू धूतलं...

याउटल बाळासाहेबांनी कधीही मॉं साहेबांचे ऐकले नाही. त्यांनी स्वत:काय ते निर्णय घेतले. परंतु रश्मी ठाकरेंचा राजकारणात व तिकीट वाटपातही हस्तक्षेप असल्याचा आरोप गोगावलेंनी केला. ते म्हणाले, आघाडीत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायचे हे निश्चित झाले होते. मात्र रश्मी ठाकरे व नातेवाईंकानी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदासाठी तयार केलं. त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत.

Raj Thackeray,Narayan Rane, Chhagan Bhujbal, Rashmi Thackeray
Devendra Fadnavis Politics : राज–उद्धव मनोमिलनाला फडणवीस भेटीचा झटका ; युतीची चर्चाच थंडावली, कार्यकर्त्यांनीही घेतलं थांबून...

पण ज्यावेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळेला आदित्य ठाकरेंना मंत्रिपद देण्याऐवजी ते दुसऱ्या एखाद्या शिवसेनेच्या मावळ्याला दिलं असतं तर त्यांची उंची वाढली असती. मात्र आदित्य ठाकरे यांना मंत्रिपद मिळावं असा हट्ट रश्मी ठाकरे यांचा होता. त्याजागी शिवसेनेचा दुसरा एखादा मावळा तयार झाला असता. परंतु तरीही रश्मी ठाकरे यांच्या आग्रहामुळे आदित्य ठाकरेंना मंत्री केलं गेलं. त्यामुळेच एवढं रामायण -महाभारत घडलं असही गोगावले म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com