

FDA officers suspension : अन्न व औषध प्रशासनातील कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खोट्या कागदोपत्री कारवाया, न्यायालयाच्या आदेशाचा अवमान आणि गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप यामुळे राज्यातील एफडीएचे 12 अधिकारी गोत्यात आले असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.
या प्रकरणात नाशिकमधील अधिकारी केंद्रस्थानी असल्याचे समोर आले आहे. नाशिक विभागातील 5 महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. नाशिक विभागातील पाच अधिकाऱ्यांसह राज्यातील इतर संबंधित अधिकाऱ्यांचा मिळून एकूण 12 जणांचा गट आहे. चौकशीत दोषी आढळल्यास या संपूर्ण गटावर कारवाई होणार आहे.
अन्नसुरक्षेसारख्या महत्त्वाच्या विभागाची जबाबदारी असतानाही या अधिकाऱ्यांकडून नियमांकडे दुर्लक्ष करून मनमानी कारभार केला जात असल्याचे समोर आले आहे. या सर्व अधिकाऱ्यांनी नियमांना बगल देऊन कागदावरच कारवाया दाखवणे आणि उच्च न्यायालयाच्या स्पष्ट आदेशांचा अवमान करत मनमानी कारभार चालवल्याचा प्राथमिक निष्कर्ष चौकशीत निघाला आहे.
त्यामुळे या अधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची टांगती तलवार असल्याची माहिती असून या प्रकरणामुळे राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात, विशेषतः नाशिकमध्ये, मोठी चर्चा सुरू झाली आहे.
अन्नाची गुणवत्ता तपासणे, नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरणाऱ्या घटकांवर नियंत्रण ठेवणे आणि बाजारातील भेसळ रोखणे ही एफडीएची प्रमुख जबाबदारी आहे. मात्र, नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या याच यंत्रणेतील काही अधिकारी बेकायदेशीर कारवाया आणि भ्रष्टाचारात सहभागी असल्याचे समोर आल्याने या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सध्या अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे. चौकशीत दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर शिस्तभंगासह निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. नाशिकमधील पाच अधिकाऱ्यांसह राज्यातील एकूण १२ अधिकाऱ्यांवर कारवाईची शक्यता असल्याने प्रशासकीय वर्तुळात हालचाली वाढल्या आहेत.
येत्या काही दिवसांत याबाबत अधिकृत आदेश जारी होण्याची शक्यता असून, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या कारवाईनंतर प्रशासनातील गैरप्रकारांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.